शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

‘दख्खनचा ताज’ बीबी का मकबराला टेकू; कोसळण्यापूर्वी संवर्धनाचे काम होणार का?

By संतोष हिरेमठ | Updated: March 6, 2025 17:45 IST

जगप्रसिद्ध बीबी का मकबऱ्यातील भिंतीला टेकू देण्यात आला आहे. मकबरा आणि चारही मिनारचीही दुरवस्था झाली आहे. 

छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध ‘दख्खनचा ताज’ म्हणजे बीबी का मकबऱ्याच्या परिसरातील कोसळण्याच्या स्थितीतील ऐतिहासिक भिंतीला अक्षरश: लाकडी आणि लोखंडी खांबांचा टेकू देऊन वाचविण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. मुख्य मकबरा आणि चारही मिनारचीही अशीच अवस्था झाली आहे. ही परिस्थिती पाहून मकबरा कोसळण्यापूर्वी संवर्धनाचे काम होणार का, असा सवाल पर्यटकांमधून व्यक्त होत आहे.

बीबी का मकबरा येथे प्रवेश करतानाच प्रवेशद्वाराची दुरवस्था पाहून पर्यटकांना आतील परिस्थितीची काही कल्पना येते. मुख्य मकबऱ्यासह चारही मिनारची जागोजागी पडझड झाली आहे. प्लास्टर निखळले आहे. जागोजागी भेगा पडल्या आहेत. नक्षीकामही जागोजागी उखडून गेले आहे. जागोजागी मकबरा काळवंडला आहे.

तिकडे दुर्लक्ष, इकडे संवर्धनमकबऱ्याची ही अवस्था असताना मकबऱ्याच्या पाठीमागील जागेतील ‘उत्तरी दालन’, ‘बारादरी’ अशी ओळख असलेल्या इमारतीच्या संवर्धनाचे काम वेगात सुरू आहे. याठिकाणपर्यंत फारसे पर्यटक येत नसतानाही संवर्धन होत आहे आणि ज्या ठिकाणी सर्वाधिक पर्यटक असतात, त्या मुख्य मकबऱ्याच्या संवर्धनाकडेच दुर्लक्ष होत आहे.

दोन वेळा दुर्घटनाबीबी का मकबऱ्याच्या एका मिनारचा भाग कोसळण्याची धक्कादायक घटना १५ जून २०२४ रोजी दुपारी घडली होती. मिनारच्या सर्वांत वर असलेल्या जाळीचा भाग खाली पडल्यानंतर अक्षरश: त्याचा भुगा झाला. सुदैवाने या घटनेत कोणाला दुखापत झाली नाही. नोव्हेंबर २०२२ मध्ये अशीच घटना घडली होती. त्यानंतरही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने हा ऐतिहासिक वारसा धोक्यात आला आहे.

३ वर्षे लोटलीमकबरा आणि चारही मिनारच्या संवर्धनासाठी गेल्या ३ वर्षांपासून निधीची प्रतीक्षा केली जात आहे. मात्र, अद्यापही निधी मिळालेला नाही, असे पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पावसाळ्यापूर्वी अंदाजपत्रक होईल मंजूरमकबरा आणि मिनारच्या संवर्धनासाठी पावसाळ्यापूर्वी अंदाजपत्रक मंजूर होईल. त्यानंतर कामाला सुरुवात होईल, अशी माहिती भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बीबी का मकबऱ्यात किती पर्यटक? (२०२४)महिना - भारतीय-परदेशीजानेवारी- १,३४,४६६/१,३०१फेब्रुवारी- ८९,१५३/१८८मार्च- ६२,३४८/९५०एप्रिल- ७३,९२४/३८६मे- १,०४,६६०/२७०जून- १,१५,६६८/२४८जुलै- ८१,१२३/३२१ऑगस्ट- ८६,८५६/३७९सप्टेंबर- ६७,८७३/४८५ऑक्टोबर- ६३,६७९/६३०नोव्हेंबर- ९३,९३३/१,०४४डिसेंबर- १,२५,०२२/९५०

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण