शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘समर कॅम्प एक्स्पो व मिशन अ‍ॅडमिशन’ला गर्दी

By admin | Updated: April 18, 2016 00:53 IST

औरंगाबाद : ‘लोकमत’तर्फे आयोजित तीनदिवसीय ‘समर कॅम्प एक्स्पो व मिशन अ‍ॅडमिशन २०१६’ च्या दुसऱ्या दिवशी रविवारी विद्यार्थी, पालकांनी तुडुंब गर्दी केली.

औरंगाबाद : ‘लोकमत’तर्फे आयोजित तीनदिवसीय ‘समर कॅम्प एक्स्पो व मिशन अ‍ॅडमिशन २०१६’ च्या दुसऱ्या दिवशी रविवारी विद्यार्थी, पालकांनी तुडुंब गर्दी केली. लोकमत लॉन, लोकमत भवन येथे शनिवारपासून या ‘एक्स्पो’ला सुरुवात झाली आहे.उन्हाळी सुट्यांत मुलांना कोणत्या नवीन गोष्टी शिकता येईल, आपल्या पाल्यांसाठी कोणत्या शाळेची निवड करावी, त्यांचा बौद्धिक विकास कसा करावा, यासह पालकांच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे ‘एक्स्पो’तील स्टॉल्सच्या माध्यमातून मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रांतील शहरातील नामवंत संस्था या निमित्ताने एकत्र आल्या आहेत. रविवारी शहरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी दुपारी ४ वाजेपासूनच माहिती घेण्यासाठी गर्दी केली. विविध स्टॉल्सना भेटी देत पालक विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी संस्थांमधील प्रवेशप्रक्रिया, शुल्क, सुविधांची माहिती घेत होते. माहिती घेताना निर्माण होणाऱ्या शंकांचे समाधान करून घेण्यात पालक मग्न होते. विविध स्टॉल्सवर काळजीपूर्वक माहिती घेताना विविध शैक्षणिक क्षेत्रांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. युनिव्हर्सल हायस्कूल प्रस्तुत ‘समर कॅम्प एक्स्पो व मिशन अ‍ॅडमिशन- २०१६’, पॉवर्ड बाय इरा इंटरनॅशनल स्कूल व सहप्रायोजक डिस्कव्हरी स्कूल हे आहेत.आज शेवटचा दिवससोमवार हा या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ४ ते ८ या वेळेत होणाऱ्या या ‘एक्स्पो’ला सर्वांना मोफत प्रवेश आहे. विविध शैक्षणिक संस्थांची माहिती एकाच छताखाली मिळविण्यासाठी शेवटचा दिवस शिल्लक राहिला आहे.सेल्फी झोन्स अन् खाद्यपदार्थांचा आस्वादएक्स्पोमध्ये मुलांच्या बालमनाचा वेध घेणाऱ्या अल्लाउद्दीन, जंगल बुक, हम्टी-डप्टी या थीम्सवर आधारित सेल्फी झोन्स मुलांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. शिवाय डीकॅथलॉन स्पोर्टस् झोनमध्ये मुलांना धमाल करता येत आहे. शैक्षणिक संस्थांची माहिती घेण्यासह विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी विशेष फूड झोनही या ठिकाणी आहे.सर्वांगीण विकासावर भरशाळेमध्ये प्रत्येक मुलाच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. शिक्षणाबरोबर नृत्य, संगीत, योगा, मार्शल आर्टस् आदींचे मुलांना प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी नामवंत प्रशिक्षक येतात. मुलांना ई-आयकार्ड दिले जातात. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असून मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. मुलांना बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षण देण्यावर भर आहे.-श्वेता वकील, मुख्याध्यापिका, युनिव्हर्सल हायस्कूल मुलांच्या सुप्त गुणांना वावशाळेत प्रत्येक मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल, असे वातावरण देण्यात आले आहे. मुलांना तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही. अनेक गोष्टी तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे मुलांना संगणकाच्या मूलभूत ज्ञानाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञानही दिले जाते. नोकरीबरोबर स्वत: उद्योजक बनून आयुष्यात भरारी घेता येते, याचेही शिक्षण मुलांना दिले जाते. बंदिस्त वर्गाऐवजी नैसर्गिक वातावरणातील शिक्षणाचा अनुभव मुलांना दिला जातो.-स्मिता कंचार, प्राचार्या, डिस्कव्हरी स्कूलमुलांना दर्जेदार शिक्षणमुंबई, पुणे यांसारख्या मेट्रोे शहरात मिळणारे दर्जेदार शिक्षण शाळेच्या माध्यमातून औरंगाबादेत उपलब्ध झाले आहे. राज्यात २० जिल्ह्यांत पहिली ते बारावीपर्यंतच्या ४५ शाळा आहेत, तर प्री प्रायमरीच्या १९० शाळा आहेत. गेल्या १० वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी केली जात आहे. त्यासाठी पुरस्कारही मिळाले आहेत. शाळेत तज्ज्ञ शिक्षक असून प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. इरा इंटरनॅशनल स्कूल ही महाराष्ट्राची पहिल्या क्रमांकाची ब्रँड स्कूल आहे.-सतीश गोरे, संचालक, इरा इंटरनॅशनल स्कूल