शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी खुलताबादेत वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खुलताबाद : येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी श्रावणाच्या दुसºया शनिवारी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. गर्दीमुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद : येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी श्रावणाच्या दुसºया शनिवारी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. गर्दीमुळे खुलताबाद शहर हनुमानभक्तांनी गजबजले होते.शुक्रवारी सायंकाळपासूनच धुळे, नाशिक, नगर व औरंगाबाद जिल्ह्यातून पायी दिंड्या, पालख्या दाखल होत होत्या. शुक्रवारी रात्री औरंगाबाद शहर व जिल्ह्यातून पायी येणाºया भाविकांची वर्दळ सुरू झाली. रात्री पायी येणारे भाविक हे लाखोंच्या संख्येने असल्याने औरंगाबाद - खुलताबाद, कन्नड - खुलताबाद, फुलंब्री - खुलताबाद, कसाबखेडा फाटा मार्गावर ठिकठिकाणी चहा, पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्रीपासूनच खुलताबाद शहरात जय भद्राचा जयघोष सुरू झाला होता. सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी झाल्याने दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरात महाप्रसाद, साबुदाना खिचडी, चहापाणी, फराळाची व्यवस्था अनेक भाविकांनी केली होती.श्रावण महिन्यातील दर शनिवारी भद्रा मारूतीची आकर्षक सजावट औरंगाबाद येथील जयसुख पटेल, नीलेश देशमुख, संजय.काळे, वल्लभ लढ्ढा, कृष्णा भुतडा हे करत असतात. श्रावणाच्या दुसºया शनिवारी अहमदाबाद येथून मारूतीसाठी मुकुट, बक्तर, पितांबर आणून त्याने मूर्तीस आकर्षकरित्या सजविण्यात आले होते. पोलिसांनी रात्रीपासून बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस निरीक्षक हरीष खेडकर व त्यांचे कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. भाविकांचे सुरळीत दर्शन व्हावे म्हणून भद्रा मारूती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ, सचिव कचरू पाटील बारगळ, सुरक्षा अधिकारी राजेंद्र जोधंळे व त्यांचे सहकारी परिश्रम घेत होते. अनेकांनी कुटुंबियासोबत देवदर्शन व पर्यटनाचा आनंद घेतला. दौलताबाद, खुलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ आदी पर्यटनस्थळे गर्दीने फुलून गेली होती.