बीड : नवरात्रौत्सवाच्या मध्यावर जिल्ह्यातील सबंध देवीच्या परिसरात भाविक भक्तांची रेलचेल सुरु झाली आहे. शहराचे ग्रामदैवत समजले जाणारे खंडेश्वरी मंदिर परिसरात सोमवारी पाचव्या माळेच्या दिवसापासूनच भाविकांची रीघ लागली आहे. नवरात्रौत्सवाच्या दरम्यान खंडेश्वरी मंदिराच्या परिसरात यात्रा साकरण्यात येत असून याची चाहूल मंदिर परिसरात सुरू आहे. विद्युत रोषणाई, रहाट पाळणे, खेळण्यांच्या विक्रीची दुकाने भाविकांची गर्दी यामुळे खंडेश्वरी परिसर दुमदुमला आहे. देवस्थान समितीच्या वतीने पाणी, वीज, सुरक्षारक्षक, माहिती क़क्ष आदींची सुविधा भाविकांसाठी करण्यात आली आहे. शहरातील वैष्णव देवी, खासबाग देवी, खंडेश्वर देवीच्या परिसरात भाविकांची गर्दी होत आहे.डोंगरतुकाईच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दीपरळी: शहरातील कालरात्री देवी मंदिर व शहरापासून ४ किमी अंतरावरील डोंगरतुकाईच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होऊ लागली आहे. सकाळी व सायंकाळी मंदिरात दर्शनासाठी भक्तांची रीघ लागत आहे. भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे याकरिता चोख बंदोबस्त राबिवण्यात आला आहे.सभ्रमाचा नाश करणारी कालरात्री देवीचे मंदिर परळी परिसरात प्रसिद्ध आहे. मंदिरात अनेक भाविक घट बसिवतात. श्री वैद्यनाथ देवस्थान कमिटीने भाविक भक्तांकरिता सोय उपलब्ध केल्या आहेत. खोल्यांची स्वच्छता, पाण्याची सोय, मंदिर परिसरात रंगरंगोटी केली आहे.डोंगरतुकाई मंदिर हे आरोग्य भवानी म्हणुन ओळखले जाते. अंबाजोगाई : अंबाजोगाईतील भटगल्लीतील कन्नडकर यांच्या वाडयात कुलस्वामिनी तुळजाभवानीची प्राचीन मूर्ती असून या ठिकाणीही नवरात्राच्या काळात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. त्यामुळे योगेश्वरीबरोबरच तुळजाभवानीचाही महिमा शहरात कायम आहे.योगेश्वरीला मागणी घालण्यासाठी भैरवनाथबरोबर येडाई व तुळजा भवानी या दोघी आल्या होत्या. अशी दंतकथा आहे. अंबाजोगाईत आलेली हीच ती कन्नकडकरांच्या वाडयातील तुळजाभवानी देवी होय. सध्या या वाडयात मूर्ती आहे. वाडयाचे मालक शंकरराव कन्नडकर हे बांधकाम करीत असतांना त्यांना देवीची मूर्ती सापडली. सदरील वाडयाचे बांधकाम २०० वर्षांपूर्वीचे आहे. शंकरराव कन्नडकर यांच्यानंतर त्यांचे पुत्र यशवंतराव कन्नडकर यांनी देवीची सेवा केली. विविध मंत्रोच्चारामुळे देवीचे सौंदर्य फुलत गेले आणि भाविकांच्या अपार श्रद्धेमुळे देवीचा महिमा वाढला.या ठिकाणी नवरात्रात कुलधर्म, कुळाचार, देवीची पुजा दरवर्षी होते. नवरात्रात दहा दिवस त्रिकाल आरती, सप्तशती पाठ, कुमारी पूजन, ब्राह्मण व सुवासिनी भोजन, कुमारी भोजन या ठिकाणी होते. ही परंपरा आजही सूर्यकांत कन्नडकर यांनी व त्यांच्या भावांनी सुरू ठेवली आहे. कै. शंकरराव पांडे, अशोक जोशी, कै. गोपाळराव पांडे, बालानंद पांडे, कांतराव मांडवकर यांच्या प्रोत्साहनाने १९८० पासून या ठिकाणी कीर्तन, भजन, गायन हे कार्यक्रम पार पडतात. अंबाजोगाईत अनेक भाविक भक्तांना देवीच्या दृष्टातांची अनुभूती आली आहे.या ठिकाणी उत्साहात नवरात्र महोत्सावास सुरूवात झाली आहे. यामध्ये स्थानिक कलावंतांचे गायन, महिला, मंडळ, भजन, पं. शिवदास देगलुरकर, अरूण जोशी यांचे गायन होणार आहे. अष्टमीच्या दिवशी महालक्ष्मी पूजन व घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती सचिन कन्नडकर व प्रसाद कन्नडकर यांनी दिली.
‘खंडेश्वरी’ला भाविकांची गर्दी
By admin | Updated: September 30, 2014 01:27 IST