शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा निधी जि.प.त अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:35 IST

जिल्हा परिषदेत अधिकारी-पदाधिका-यांमध्ये सुसंवाद नसल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नियोजन रखडलेले आहे. जि.प. उपकरातील ३६ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीपैकी आठ महिन्यांमध्ये अवघ्या ९ कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन झाले आहे. त्यामुळे याही आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेत अधिकारी-पदाधिका-यांमध्ये सुसंवाद नसल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नियोजन रखडलेले आहे. जि.प. उपकरातील ३६ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीपैकी आठ महिन्यांमध्ये अवघ्या ९ कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन झाले आहे. त्यामुळे याही आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहण्याची चिन्हे दिसत आहेत.यंदा जि.प. उपकराचा ३६ कोटी २५ लाख रुपयांचा निधी असून, जिल्हा नियोजन समितीने ९३ कोटी रुपयांचे नियत्वे मंजूर केलेले आहेत. दलित वस्ती सुधार योजनेचा जवळपास २५ ते ३० कोटी रुपयांचा निधी आहे. उपकराचा निधी चालू आर्थिक वर्षातच खर्च करणे बंधनकारक आहे. त्यानुसार आठ महिन्यांमध्ये अवघा ९ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे, तर जिल्हा नियोजन समितीचे १८ कोटी रुपयांचे नियोजन झाले आहे. आर्थिक वर्ष मावळण्यास आता अवघे तीन महिने राहिले आहेत. असे असताना अजून सिंचन, बांधकाम, आरोग्य, शिक्षण, कृषी आणि समाजकल्याण विभागामार्फत विकास कामांचे नियोजन झालेले नाही, त्यामुळे सदस्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. विद्यमान पदाधिकाºयांनी अधिकाºयांवर दबाव टाकून जवळपास ३ कोटी रुपयांची नाला खोलीकरण व सरळीकरणाची कामे रद्द केली. ही कामे तत्कालीन पदाधिकाºयांनी मंजूर केलेली होती. विशेष म्हणजे, या कामांना प्रशासनाने प्रशासकीय मंजुरी व कार्यारंभ आदेशही दिलेले होते. केवळ दुटप्पी भूमिकेतून ही कामे रद्द केली आहेत, अशी टीका तत्कालीन शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी केली आहे. विद्यमान पदाधिकाºयांना अधिकाºयांनी नियम सांगितला, तर त्यांना धारेवर धरले जाते.एकीकडे अधिकाºयांना केवळ तोंडी आदेश देत प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे रद्द करण्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे प्राप्त निधीतून कामांचेही नियोजन केले जात नाही.अधिकारी-पदाधिकाºयांमध्ये ताळमेळ नाहीमागील आर्थिक वर्षातील जवळपास १० ते १२ कोटी रुपयांचा निधी शासनाला परत द्यावा लागला. सिंचन विभागाने ३१ मार्च रोजी अखर्चित राहिलेला ७ कोटी रुपयांचा निधी लघु सिंचन स्थानिक स्तर विभागाला दिला. या विभागाने तो निधी चालू आर्थिक वर्षात खर्च केला. नियमानुसार शासनाचा निधी दोन वर्षांच्या आत खर्च करणे बंधनकारक असते. ३१ मार्च रोजीच दोन वर्षांची मुदत संपली असेल, तर लघु सिंचन विभागाने तो निधी कसा खर्च केला. तो निधी देण्याऐवजी आपल्याच खात्यात ठेव म्हणून जमा करता आला असता; परंतु पदाधिकारी-अधिकाºयांमधील विसंवादामुळे कोणताही अधिकारी जबाबदारी घ्यायला तयार नाही. परिणामी, जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या सुंदोपसुंदीमुळे सर्वसामान्य सदस्यांना विकासकामांपासून वंचित राहावे लागत आहे.