शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पेयजल योजनेत कोट्यवधींचा गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:49 IST

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत तांत्रिक अनियमिततेच्या माध्यमातून जवळपास ५० योजनांमध्ये २० ते २५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत तांत्रिक अनियमिततेच्या माध्यमातून जवळपास ५० योजनांमध्ये २० ते २५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असून, याप्रकरणी तत्कालीन कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता व कंत्राटदारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य एल. जी. गायकवाड यांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे केली.यासंदर्भात जि.प. सदस्य गायकवाड यांनी गुरुवारी विभागीय आयुक्तांना सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, जि.प. पाणीपुरवठा विभागामार्फत राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजना उभारल्या जातात. योजनेचे प्रस्ताव तयार करताना सोयीप्रमाणे जनगणनेची दशकनिहाय लोकसंख्येची आकडेवारी घेणे, चुकीची लोकसंख्यावाढ दर्शवून योजनेला मंजुरी देणे, सन २०१४ ते जून २०१७ दरम्यान तत्कालीन कार्यकारी अभियंता रबडे यांनी किमान ५० प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे.पाणीपुरवठा योजनांची अंदाजपत्रके फुगवून बनविणे, विशिष्ट कंत्राटदारांना डोळ्यासमोर ठेवून अंदाजपत्रके तयार करणे, योजनांच्या कामासाठी ६० ते ७० किलोमीटर दूरवरून वाळू, खडी आणावी लागणार, अशी खोटी माहिती नमूद करून वाढीव दर मंजूर करणे, यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान केले आहे. वास्तविक ही कामे मंजूर करण्यापूर्वी संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी साहित्यांची ‘लीड’ तपासणे आवश्यक असते, पण या कामांच्या बाबतीत सर्वच जबाबदार अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करून याची सखोल चौकशी करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये सहा उपविभागांतर्गत काही मोजक्याच कंत्राटदारांत आपसामध्ये कामे वाटून घेतली जातात. ई-निविदा प्रक्रिया राबविल्याचा केवळ देखावा करण्यात आलेला आहे. ही प्रक्रिया योग्य प्रकारे राबवली असती, तर कंत्राटदारांमध्ये स्पर्धा झाली असती आणि कमी दराच्या निविदा प्राप्त झाल्या असत्या. ज्यामुळे शासनाच्या पैशाचा अपव्यय टळला असता; पण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे.