शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

औद्योगिक वसाहतींमुळे ग्रामपंचायती झाल्या करोडपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 12:26 IST

औरंगाबाद, बीड आणि जालना या जिल्ह्यांतील औद्योगिक वसाहतींमुळे अनेक ग्रामपंचायती करोडपती बनल्या आहेत.

ठळक मुद्दे औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना आणि बीड हे तीन जिल्हे आहेत. तिन्ही जिल्ह्यांत २१ औद्योगिक क्षेत्रे आहेत. तीन जिल्ह्यांत मिळून १९ कोटी ७१ लाख ६७ हजार ३८८ रुपयांचा कर एमआयडीतून गोळा झाला.

औरंगाबाद : औरंगाबाद, बीड आणि जालना या जिल्ह्यांतील औद्योगिक वसाहतींमुळे अनेक ग्रामपंचायती करोडपती बनल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रातून करापोटी कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत; परंतु तुलनेत औद्योगिक वसाहतींत सुविधा मिळत नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना आणि बीड हे तीन जिल्हे आहेत. तिन्ही जिल्ह्यांत २१ औद्योगिक क्षेत्रे आहेत. औरंगाबादेत वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन या औद्योगिक क्षेत्रांबरोबर अतिरिक्त शेंद्रा, लाडगाव-करमाड औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-१, बिडकीन औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-२ यांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यात जालना टप्पा-१, टप्पा-२, टप्पा-३ हे क्षेत्र आहेत.  बीड जिल्ह्यात बीड, माजलगाव हे क्षेत्र येतात. 

औद्योगिक वसाहतींमध्ये ग्रामपंचायतींकडून स्वायत्ततेमुळे वेगवेगळी कर आकारणी होत असल्याच्या तक्रारी उद्योजकांकडून होत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार ‘एमआयडीसी’ने औद्योगिक वसाहतींमध्ये ग्रामपंचायतींकडून होणारी कर आकारणीची आकडेवारी संकलित केली. यातून समोर आलेली आकडेवारी डोळे फिरवणारी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती १ कोटीपेक्षा अधिक कर वसूल करीत असल्याचे समोर आले आहे. औद्योगिक क्षेत्रात रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा, साफसफाई, अशा मूलभूत सुविधा ग्रामपंचायतींकडून पुरविल्या जात नाहीत; परंतु प्राधान्याने कर आकारला जातो. 

औद्योगिक वसाहतींमध्ये सोयी-सुविधांच्या नावाखाली उद्योगांकडून प्रत्येक ग्रामपंचायती वेगवेगळे कर आकारणी करीत असल्याने उद्योगांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. जीएसटी लागू झाल्याने ग्रामपंचायत कर रद्द करावा, एमआयडीसी सेवा पुरविते, आम्हाला तिथेच कर भरण्याची मुभा असावी, संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत करात सुसूत्रता असावी, अशी मागणी उद्योजकांकडून होत आहे. 

कर वसुलीची परिस्थिती- गेल्या वर्षभरात औरंगाबादेतील चिकलठाणा, रेल्वेस्टेशन एमआयडीसीतून मनपाला ३ कोटी ४१ लाख ३६ हजार ५८९ रुपयांचा कर मिळाला. - वाळूज महानगरातील वाळूज, रांजणगाव, नायगाव, घाणेगाव-विटावा, वळदगाव, पंढरपूर, वडगाव (को.) ग्रामपंचायतींकडून औद्योगिक वसाहतींमधून एकूण १३ कोटी ६३ लाख ११ हजार ८११ रुपयांचा कर वसूल झाला. यात पाच ग्रामपंचायतींची कर वसुली कोटीच्या घरात आहे. - शेंद्रा, पैठणमधील ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींतून तब्बल १८ कोटी ८३ लाख ६७ हजार ९५० रुपयांचा कर आकारणी झाली. - जालना औद्योगिक क्षेत्रातील जुना जालना, जालना टप्पा-१, टप्पा-२ अणि टप्पा-३ येथून नगरपालिकेला ८७ लाख ९३ हजार २०३, तर बीड जिल्ह्यातील एमआयडीसीतून केवळ ६ हजार २३५ रुपयांचा कर वसूल झाला. - तीन जिल्ह्यांत मिळून १९ कोटी ७१ लाख ६७ हजार ३८८ रुपयांचा कर एमआयडीतून गोळा झाला.

सुविधांचा अभावअधिकार आहे म्हणून करवसुली केली जाते; परंतु ग्रामपंचायतींकडून औद्योगिक वसाहतींमध्ये कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. करवसुली कायद्यात असल्याने उद्योजकांना काही बोलता येत नाही. ग्रामपंचायतींमध्ये किमान एक समान करवसुली केली पाहिजे. - सुनील किर्दक, उद्योजक

शासनाने माहिती मागितलीऔद्योगिक वसाहतींमधून ग्रामपंचायतींना करापोटी किती महसूल मिळतो, याबाबत शासनाने माहिती मागवली आहे. त्यानुसार ही माहिती गोळा करण्यात आली. यात प्रादेशिक कार्यालयांतर्गत सुमारे तीन जिल्ह्यांतून सुमारे १९ कोटींची करवसुली केली जात आहे. ही माहिती शासानाला सादर केली जाणार आहे.- सोहम वायाळ, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

टॅग्स :MIDCएमआयडीसीTaxकरgram panchayatग्राम पंचायतWaluj MIDCवाळूज एमआयडीसीChikhalthana MIDCचिखलठाणा एमआयडीसीDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर