शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

८५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By admin | Updated: March 17, 2017 00:25 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा, लातूर, निलंगा, उदगीर, देवणी, रेणापूर तालुक्यांतील अनेक गावांत बुधवारी झालेल्या गारपिटीमुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा, लातूर, निलंगा, उदगीर, देवणी, रेणापूर तालुक्यांतील अनेक गावांत बुधवारी झालेल्या गारपिटीमुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासनाला दिले आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांची गावस्तरावर समिती गठित करण्यात आली असून, या समितीमार्फत पंचनाम्याला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात एकूण ८५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.लातूर तालुक्यातील हजारो हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान गारपिटीमुळे झाले असून, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार संजय वारकड तसेच तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व गावातील शेतकऱ्यांनी ढोकी-येळी, चिंचोली बल्लाळनाथ, पिंपरी आंबा आदी गावांतील शिवारामध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच औसा तालुक्यात औसा, रेणापूरचे उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार अहिल्या गाठाळ यांनी पाहणी केली असून, औसा तालुक्यात जवळपास २५ द्राक्षबागा असून, या बागा गारपिटीने अक्षरश: आडव्या झाल्या आहेत. द्राक्ष पिकांची मोठी हानी गारपिटीमुळे झाली असून, त्याची पाहणी या अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी केली. तीन वर्षांपूर्वी झालेल्या गारपिटीने लातूर जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीची आठवण कालच्या वादळ-वाऱ्याने करून दिली असून, या वादळात आंब्याची झाडे, द्राक्ष बागा, फळबागा नष्ट झाल्या आहेत. तसेच गहू, हरभरा, ज्वारी या पिकांवरही अक्षरश: पाणी पडले आहे. त्याचा पंचनामा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांची समिती गठित केली असून, या समितीमार्फत गावातील प्रत्येक शेतातील पिकांचा पंचनामा केला जाणार आहे. येत्या आठ दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या समित्यांना दिले आहेत. शेत, गाव आणि पीकनिहाय याद्या तयार करून पंचनामे केले जाणार आहेत. त्यानंतर अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे. (प्रतिनिधी)