शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गंधीने शहरवासीय त्रस्त

By admin | Updated: May 6, 2017 00:09 IST

बीड : देशातील ४३४ स्वच्छ शहराच्या यादीत महाराष्ट्रातील ४४ शहरांपैकी बीड हे एक शहर असल्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर केले अन् बीडकरांच्या भुवया उंचावल्या

व्यंकटेश वैष्णव ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : देशातील ४३४ स्वच्छ शहराच्या यादीत महाराष्ट्रातील ४४ शहरांपैकी बीड हे एक शहर असल्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर केले अन् बीडकरांच्या भुवया उंचावल्या. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. शहरात बोटावर मोजण्याइतकीच सार्वजनिक शौचालये असली तरी त्यांची दुरवस्था झालेली आहे. अशा पार्श्वभूमीवर स्वच्छ सर्वेक्षणात भारतात बीडचा ३०२ क्रमांक आला कसा, हा प्रश्न बीडकरांना पडला आहे.स्वच्छता सर्वेक्षण-२०१७ मध्ये भारतातून ४३४ शहरांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४४ शहरे आहेत. यात बीडचा ३०२ क्रमांक असल्याचे दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून जाहीर झाले. बीड शहरातील स्वच्छतेची वस्तुस्थिती अत्यंत गंभीर आहे. बीड नगरपालिकेचा कारभार सध्या उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्याकडे आहे. याबाबत त्यांना संपर्क केला असता त्यांनी स्वच्छता सर्वेक्षणमध्ये बीडला मिळालेल्या क्रमांकाबाबत माहिती नसल्याचे सांगितले.आजघडीला बीड शहरातील स्वच्छतेचा पूर्णत: बोजवारा उडालेला आहे. चक्क टेंडर संपल्यामुळे काही महिन्यांपासून घंटागाड्या बंद आहेत. परिणामी ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याने शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बीड शहरातील भाजी मंडई, बशीरगंज, मोमीनपुरा, सहयोगनगर, कटकटपुरा, स्वराज्यनगर आदी भागांत कचऱ्याची दुर्गंधी पसरली आहे. हद्दवाढ भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. वस्तुस्थिती लक्षात घेतली तर स्वच्छता सर्वेक्षण-२०१७ मध्ये बीडचा क्रमांक कसा आला, याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.