शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

शहरातील गुन्ह्यांचा आलेख झपाट्याने वाढला

By admin | Updated: December 22, 2015 23:55 IST

औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शहरातील गुन्हेगारीचा आलेख दीडपटीने वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शहरातील गुन्हेगारीचा आलेख दीडपटीने वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत तब्बल ५,६५४ गुन्हे नोंदविण्यात आले. यात ३५ खून, ५८ बलात्कार, ३०० हून अधिक घरफोड्या तर दोन हजारांवर चोऱ्यांचा समावेश आहे. ८२० वाहने आणि ६३९ मोबाईल चोरट्यांनी पळविले. औरंगाबाद शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत शहरातील खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, मंगळसूत्र चोरी, घरफोडी, मोबाईल चोरी, वाहन चोरी, सरकारी नोकरांवरील हल्ला, अशा गंभीर गुन्ह्यांचा आकडा दीडपटीने वाढला आहे. पोलीस आयुक्तालयातील सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील विविध भागांत गतवर्षी ३३ खून झाले होते. यावर्षी खुनाचा आकडा ३५ पर्यंत गेला असून, पाच खुनांचा उलगडा झालेला नाही. खुनाचा प्रयत्न करण्याच्या ७९ घटना घडल्या. गतवर्षी या घटनांची संख्या ४८ होती. ५८ महिलांवर बलात्कार झाले आहेत. गतवर्षी २३ दरोडे पडले होेते, तर यावर्षी २४ दरोडे पडलेले आहेत. यापैकी एका घटनेतील आरोपी अद्याप मोकाट आहेत. शस्त्राचा धाक दाखवून लुटमारीच्या यावर्षी १९८ घटना घडल्या. यापैकी १३६ घटनांमधील आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. तर गतवर्षी लुटमारीच्या १८६ घटना घडल्या होत्या. गतवर्षी ६६ महिलांचे मंगळसूत्र चोरट्यांनी पळविले होते, तर नोव्हेंबरअखेरपर्यंत ४० महिलांचे मंगळसूत्र चोरट्यांनी पळविले. यापैकी केवळ १६ घटनांमधील चोरट्यांना पकडण्यात आले. घरफोड्यांचे प्रमाणही वाढले असून, गतवर्षी २४२ घरे फोडली. यावर्षी ३०८ घरे फोडून चोरट्यांनी कोट्यवधींचा ऐवज पळविला. यातील ७३ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. चोऱ्यांची संख्याही २००८ पर्यंत आहे. आतापर्यंत ८२० वाहने आणि ६३९ मोबाईल चोरट्यांनी चोरून नेले आहेत.