शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रुपयांना गंडा घालणा-या एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: April 22, 2017 17:21 IST

दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे भूखंड वृद्धाला विक्री करून ११लाख ५०हजाराचा गंडा घातल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील तीन जणांसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.

 ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 22 -  गारखेडा परिसरातील (सर्व्हे नंबर ४२)गणेशनगर येथील दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे भूखंड वृद्धाला विक्री करून ११लाख ५०हजाराचा गंडा घातल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील तीन जणांसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
 
गंगासागर दगडू शिंदे, दगडू शिंदे, महेश शिंदे आणि सुरेश केशवराव राठोड अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार शेषराव वर्जू राठोड(६२,रा.  जिजामाता कॉलनी, जयभवानीनगर) यांना भूखंड खरेदी करायचा असल्याचे त्यांनी त्यांचा पुतण्या सुरेश केशवराव राठोड यास सांगितले. 
 
त्याने आरोपी गंगासागर शिंदे, दगडू शिंदे आणि महेश शिंदे यांच्या मालकीचे गणेशनगर येथील प्लॉट क्रमांक ११२, १०१ विक्री असल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांना आरोपींनी दोन्ही भूखंड दाखवले. हे भूखंड पसंत पडल्याने तक्रारदार यांनी भूखंड खरेदी करण्याची तयारी दर्शविली. यावेळी त्यांच्यात ११लाख ५० हजार रुपयांत या भूखंडाचा सौदा झाला. २१ मे २०१५ रोजी आरोपींना पैसे दिल्यानंतर त्यांनी तक्रारदार यांच्या नावे हेदोन्ही भूखंड कायमस्वरुपी विक्री केल्याबाबतचे नोटरी  नोंदणीकृत खरेदीखत करून दिले. 
 
हा व्यवहार झाल्यानंतर काही दिवसाने तक्रारदार यांच्या दोन्ही भूखंडावर दुस-याच व्यक्तींनी ताबा घेतल्याचे त्यांना समजले. यामुळे तक्रारदार यांनी ताबा घेणा-याना याविषयी जाब विचारला असता त्यांनी ते दोन्ही भूखंड त्यांच्याच मालकीची असल्याचे आणि त्याबाबतचे कागदपत्रे त्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर तक्रारदार यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली असता त्यांनी पैसे आज देतो, उद्या देतो असे केले. पुतण्या सुरेश याच्या मदतीने उर्वरित आरोपींनी आपल्याला दुसºयाच्या भूखंडाची बनावट  कागदपत्रे दाखवून फसवणुक केल्याचे समजले. याप्रकरणी त्यांनी २१ एप्रिल रोजी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.पोलीस उपनिरीक्षक चासकर तपास करीत आहेत.