शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

अकरा वीटभट्टी चालकांवर गुन्हे

By admin | Updated: July 14, 2014 00:59 IST

पालम : तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावरील वीटभट्टी व्यवसाय करणाऱ्या चालकांनी शासनाचा महसूल बुडविला आहे.

पालम : तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावरील वीटभट्टी व्यवसाय करणाऱ्या चालकांनी शासनाचा महसूल बुडविला आहे. या वीटभट्टीचालकांकडून रक्कम वसूल करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या पथकाने कारवाई सुरु केली आहे. महसूल बुडविणाऱ्या ११ वीटभट्टीचालकांवर पालम पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे वीटभट्टीचालकांत धावपळ सुरू झाली आहे. तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात वीटभट्टी व्यवसायासाठी माती उपलब्ध होत आहे. तसेच पाण्याची व्यवस्था असल्याने या परिसरात जागोजागी वीटभट्ट्यांचा व्यवसाय थाटला आहे. या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने दरवर्षी वीटभट्टींचा आकडा वाढत आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवित भट्टीचालकांनी मनमानी कारभार सुरू केल्याने शासनाला लाखो रुपयांचा चूना लागत आहे. वीटभट्टी चालकांकडून कर भरले जात नाहीत. यामुळे तहसील कार्यालयाने महसूल वसूलीसाठी विशेष मोहीम राबवित पथक निर्माण केले आहे. या पथकाने तहसीलदार अनंत देशपांडे यांच्या आदेशावरून गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे. फरकंडा, डिग्रस, बरबडी या गावातील गोदावरीच्या काठावरील ११ वीटभट्टीचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ३ लाख ७० हजार ५३ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पालम पोलिस ठाण्यात फिर्यादी तलाठी सतीश मुलगीर यांच्या फिर्यादीवरून ११ वीटभट्टीचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याने वीटभट्टीचालकांची धावपळ सुरू झालेली आहे. तपास पालम पालिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रभाकर राठोड, रंगनाथ दुधाटे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)लाखो रुपयांची होणार वसुलीपालम तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वीटभट्ट्या चालविल्या जातात. या वीटभट्टीकडून म्हणावा तसा महसूल शासनदरबारी जमा होत नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा फटका शासनाला बसत आहे. वीटभट्टी चालकांच्या विरोधात तहसील कार्यालयाने मोहीम उघडल्याने लाखो रुपयांचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे.