लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : वैयक्तिक शौचालय बांधण्यासासाठी शासनाचा निधी उचलून शौचालय न बांधता शासकीय निधीचा गैरवापर केल्या प्रकरणी परतूर पोलिसात नगर परिषदेचे कर्मचारी रामेश्वर मुळे यांच्या फिर्यादीवरून पंचवीस जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परतूर शहरात स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शौचालय बाधंण्यासाठी अभियान राबविण्यात आली होती. ज्या घरात शौचालय नाही. अशा व्यक्तींना निधीही देण्यात आला होता. पहिला हप्ता ६ हजार रू. होता व जवळपास १८ हजार रू. टप्प्या टप्प्याने लाभार्थ्यांना देण्यात आले. यामध्ये गाव व मोंढा भागातील पंचवीस लाभार्थ्यांनी या शौचालसाठीच्या निधीचा पहिला हप्ता ६ हजार रू देण्यात आला मात्र या लाभार्थ्यांनी बँकेमार्फत पैसे उचलले.
शासकीय निधीचा अपहार करणाऱ्या २५ जणांवर गुन्हा
By admin | Updated: May 26, 2017 00:40 IST