उस्मानाबाद : शहरात शुक्रवारी रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार डॉल्बी चालक-मालकांसह १२ जणांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसर, शहरातील जिल्हा रूग्णालय, पोष्ट आॅफिससह विविध मार्गावरून शुक्रवारी रात्री मिरवणुका काढण्यात आल्या होत्या़या मिरवणुकांमध्ये बंदोबस्तावरील पोलिसांनी डॉल्बी चालकांना डॉल्बीचा आवाज नियमानुसार ठेवण्याबाबत सूचना दिल्या होत्या़ मात्र, संबंधित डॉल्बी चालकांनी याकडे दुर्लक्ष करीत १०० डेसीबल पेक्षा जास्तीच्या आवाजात डॉल्बी वाजविली़ याबाबत हनुमंत पुरके, गोविंद जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित डॉल्बी चालकासह १२ जणांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
चार डॉल्बी चालकांसह बारा जणांविरूध्द गुन्हा
By admin | Updated: April 15, 2017 21:32 IST