शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

सुविधांअभावी शाळेच्या आवारातच अंत्यसंस्कार

By admin | Updated: September 30, 2016 01:15 IST

अनिल तांगडे , वडोद तांगडा भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील योगेश भालेराव या जवानाचा बुधवारी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर जिल्हा परिषद शाळेच्या आवारातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनिल तांगडे , वडोद तांगडाभोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील योगेश भालेराव या जवानाचा बुधवारी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर जिल्हा परिषद शाळेच्या आवारातच अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीसाठी हक्काची जागा नसणे आणि असुविधांमुळे ऐनवेळी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. यानिमित्ताने स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वडोद तांगडा या गावची लोकसंख्या आठ हजारांच्या जवळपास आहे. तसेच पंचायत समिती सर्कलचे गाव असून परिसरातील १२ शाळांचे केंद्र आहे. परंतु मागील काही दिवसांपासून गावात अपुऱ्या सुविधांचा त्रास ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. यातच स्मशानभूमीचा प्रश्न तर कित्येक वर्षांपासून रखडलेला आहे.गावापासून अर्धा किमीच्या अंतरावर विविध समाजांसाठी स्मशानभूमी करण्यात आलेली आहे. याची कोठेही शासन दरबारी नोंद नाही. हक्काची स्मशानभूमीला जागा देण्यासाठी ग्रामस्थ आणि ग्राम पंचायतने वरिष्ठांकडे वारंवार मागणी केली, परंतु याची कसलीच दखल प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. तसेच हे गाव राजकीय क्षेत्रात नेहमीच चर्चेत असते. त्यातच पं. स. सर्कलचे गाव असल्याने येथे नेते, मंत्री, आमदार, खासदारांची नेहमीच ये-जा असते.हे लोकप्रतिनिधी गावात आल्यानंतर ग्रामस्थ हक्काने त्यांच्याकडे स्मशानभूमिचा प्रश्न मांडतात. हे नेतेही नेहमीप्रमाणे आश्वासने देऊन ग्रामस्थांना शांत करतात, प्रत्यक्षात मात्र काहीच उपाययोजना करीत नसल्याने ग्रामस्थही आता संतप्त झाल्याचे पहावयास मिळत आहे. राजकीय नेत्यांची उदासिनता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच वडोद तांगडा येथील ग्रामस्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.