शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

जिल्हा रुग्णालयात सुविधा निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:00 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध गैरसोयींच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीसमोर आक्रोश धरणे : सोनोग्राफी बंद, डॉक्टरांच्या जागा रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध गैरसोयींच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्हा सामान्य रुग्णालयावर जिल्ह्यातील १५ लाख लोकसंख्येचा भार आहे. मात्र त्यासाठी एकच सोनोग्राफी मशिन आहे. तीही बºयाचदा बंदच असते. प्रसुतीच्या रुग्णांसाठीही तिचा अनेकदा वापर होणे अवघड ठरते. शिवाय गरोदर माता व बाल संगोपनासाठी शासन विविध कार्यक्रम आखत असले तरीही जिल्हा सामान्य रुग्णालयात एकही महिला स्त्रीरोग तज्ज्ञ नाही. त्यामुळे येथून अनेक महिलांना नांदेडला प्रसुतीसाठी पाठविले जाते. तर आॅक्सिजन व इतर सुविधा नसल्याचे सांगून दुसºयांदा सिझरच्या रुग्णाला तर थेटच नांदेडचा रस्ता दाखविला जातो. यात मोठा भूर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे किमान स्त्रीरोग तज्ज्ञ व सोनोग्राफी तज्ज्ञ महिला डॉक्टर नेमाव्यात, एमआरआयची सुविधा उपलब्ध करून द्यावी, किरकोळ शस्त्रक्रियांसाठीचे रुग्ण नांदेडला पाठविणे बंद करावे, शासकीय रुग्णालयात इतरही अनेक सोयीसुविधांची आवश्यकता आहे. या सुविधा वाढवाव्यात अशा अनेक मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. यासाठी यापूर्वीही निवेदने दिली होती. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणत्याच रिक्त जागा भरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.यात आंदोलनस्थळी स.सलाहोद्दीन हाशमी, पठाण मोहसीन खान, पठाण हसन खान, शे.कलीम शे.मौला बागवान, पठाण जुबेर खान, शेख उस्मान टेलर, शेख मुस्ताक आदींची उपस्थिती होती.