राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यक्रमाचे आयोजन
मुंडे यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये युवकांचा मोठा भरणा होता. क्रेनच्या सहाय्याने मुंडे यांना भलामोठा हार घालण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता भांगे, माजी नगरसेवक ख्वाजा शरफोद्दीन, मयूर सोनवणे, कय्युम शेख आदींसह अनेक कार्यकर्ते होते. मुंडे यांचे वाहन रस्त्याच्या मध्यभागी थांबले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने हार घालण्यात आला. यावेळी मुंडे यांच्या वाहनाजवळ मोठी गर्दीही उसळली. यामुळे रस्ता ठप्पच झाला. पाठीमागून येणाऱ्या वाहनाला पुढे येण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही. यामुळे चिकलठाणापासून ते केंब्रीज चौकाच्या दिशेने सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली. मुंडे मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यासाठीही काही वेळ गेला. यावेळी तिथे काही पोलीसही उपस्थित होते; मात्र पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला नाही.
अनेक प्रश्न उपस्थित
रस्त्यावर विनापरवाना उभा असलेला क्रेन पोलिसांनी का हटविला नाही?
पोलिसांनी वाहतूक सुरळीत का केली नाही?
खोळंबलेल्या वाहनधारकांना झालेल्या मानसिक त्रासाला कोण जबाबदार?
रस्ता अडविणाऱ्या कार्यकर्त्यावर पोलीस कारवाई करणार का?