शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

दुकान फोडणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद

By admin | Updated: May 7, 2017 00:09 IST

मुरूड : येथील शिवाजी चौकात असलेली आठ दुकाने गुरूवारी मध्यरात्री फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली होती़ दरम्यान, दुकान फोडणारे चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले

लोकमत न्यूज नेटवर्कमुरूड : येथील शिवाजी चौकात असलेली आठ दुकाने गुरूवारी मध्यरात्री फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली होती़ दरम्यान, दुकान फोडणारे चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून, त्यांच्या अटकेसाठी मुरूड पोलिसांचे पथक रवाना झाले आहे़ लातूर तालुक्यातील मुरूड येथे गुरूवारी मध्यरात्री शिवाजी चौकातील आठ दुकाने चोरट्यांनी फोडली होती़ याप्रकरणी रामदास हणमंतराव नाडे यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी मुरूड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान, पोलिसांनी शिवाजी चौकातील काही सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुकान फोडणारे चोरटे कैद झाल्याचे आढळून आले़ हे सीसीटीव्ही फुटेज मुरूड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या फुटेजमध्ये कैद असलेल्या चोरट्यांची पोलिसांना ओळख पटली असून, त्यांच्या अटकेसाठी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे़ मुरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील चोरट्यांनी बीअरबार फोडून जवळपास अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली होती़ या प्रकरणातील उर्वरित १० आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत़ यातील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील पळसप येथून ताब्यात घेतले होते़ त्यानंतर दोन आठवड्यांनी पुन्हा मुरूडमध्ये दुकान फोडीची घटना घडली़ सहा महिन्यापूर्वी मुरूडमध्ये दुकान फोडीची घटना घडली होती़ सातत्याने घडफोडी आणि चोरीच्या घटना घडत असल्याने व्यापारी, नागरिकांत भीतीचे वातावरण आहे़