शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

देश- विदेशातील पर्यटन ठप्प; आगाऊ बुकिंगमध्ये पर्यटकांचे अडकले सुमारे ८० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 13:28 IST

विविध विमान कंपन्यांनी तिकिटांचे पैसे परत करण्याऐवजी वर्षभरात तिकिटाच्या पैशावर विमान प्रवास करण्याचा पर्याय दिला.

ठळक मुद्देमार्च  ते जूनअखेर हा पर्यटन कालावधी म्हणून ओळखला जातो.मराठवाड्यातील १५ हजार पर्यटक 

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे जगभरातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. देश-विदेशांतील सहलीसाठी हॉटेल, विमान आणि रेल्वे प्रवासाचे आगाऊ बुकिंग करणाऱ्या मराठवाड्यातील सुमारे १८ ते १९ हजार  पर्यटकांचे सुमारे ८० कोटी रुपये अडकून पडले आहेत. विविध विमान कंपन्यांनी तिकिटांचे पैसे परत करण्याऐवजी वर्षभरात तिकिटाच्या पैशावर विमान प्रवास करण्याचा पर्याय दिला. रेल्वेने मात्र, नियमानुसार पैसे परत देण्याची तयारी दर्शविली आहे. 

मार्च  ते जूनअखेर हा पर्यटन कालावधी म्हणून ओळखला जातो. यावर्षीही औरंगाबादमधील ट्रॅव्हल एजंटांनी पर्यटकांचा व्हिसा ते विमान, रेल्वे, बस प्रवासाची आगाऊ तिकिटे आणि राहण्यासाठी हॉटेलची बुकिंग केली. मात्र, डिसेंबर-जानेवारीपासून जगभरातील विविध देशांत  कोरोना महामारीची साथ आली आणि पर्यटन व्यवसाय ठप्प झाला. विविध देशांनी व्हिसा रद्द केला. आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांची उड्डाणे रद्द केली. भारतात दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत यापुढे आणखी किमान सहा महिने तरी पर्यटकासाठी विविध देशांची दारे उघडण्याची शक्यता नाही. साहजिकच सर्व सहली रद्द झाल्या आहेत. परिणामी, ट्रॅव्हल एजंटांकडे सहलीसाठी नोंदणी करणाऱ्या पर्यटकांचे आगाऊ विमान तिकीट बुकिंग आणि हॉटेल बुकिंगमध्ये सुमारे ८० कोटी रुपये अडकली आहेत.

ही रक्कम परत मिळावी याकरिता पर्यटकांनी  ट्रॅव्हल एजंटची दारे ठोठावण्यास सुरुवात केली. यामुळे  ट्रॅव्हल एजंटांनी देश-विदेशातील विमान कंपन्या आणि हॉटेल्सकडे तगादा सुरू केला. मात्र, हॉटेल आणि विमान कंपन्यांनी बुकिंग रद्द करून पैसे परत करण्यास असमर्थता दर्शवून त्याच व्यक्तीला आगामी काळात विमान प्रवास करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती औरंगाबाद ट्रव्हल एजंट असोसिएशनचे अध्यक्ष आशुतोष बडवे यांनी दिली. ते म्हणाले की, असे असले तरी आगामी काळात प्रवासभाडे वाढल्यास वाढीव रक्कम प्रवाशांना भरावी लागणार आहे. दुसरीकडे, रेल्वे तिकीट बुकिंग रद्द करण्याचे पैसे नियमाप्रमाणे परत मिळतील. पर्यटकांचे नुकसान होऊ नये, याकरिता आम्ही संबंधित विमान कंपन्या आणि हॉटेल व्यवस्थापन यांच्याकडे पाठपुरावा करीत आहोत.

मराठवाड्यातील १५ हजार पर्यटक मराठवाडा आणि शेजारील जिल्ह्यांतील  सुमारे १५ ते १६ हजार पर्यटक देशांतर्गत, तर साडेतीन ते चार हजार पर्यटक देशाबाहेर पर्यटनासाठी जातात. त्यासाठी औरंगाबादेतील विविध ट्रॅव्हल एजंटकडे ही मंडळी आगाऊ बुकिंग करतात.  

आणखी सहा ते सात महिने पर्यटन व्यवसायावर संक्रांतआपल्याकडे देशांतर्गत पर्यटन मोठ्या प्रमाणात होते. ‘कोरोना’ची साथ आटोक्यात आल्यानंतर पर्यटन सुरू होईल, तर विदेशातील पर्यटन हे संबंधित देशांच्या निर्णयावर अवलंबून आहे. यापुढे आणखी सुमारे सहा ते सात महिने पर्यटन व्यवसाय ठप्प राहण्याची चिन्हे दिसत आहेत. -आशुतोष बडवे, अध्यक्ष, औरंगाबाद ट्रॅव्हल एजंट असोसिएशन 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarathwadaमराठवाडाtourismपर्यटन