शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

समुपदेशनाची ‘शाळा’

By admin | Updated: July 22, 2014 00:19 IST

वसमत : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना पदवीधर पदस्थापना देताना समुपदेशन व पारदर्शकतेला फाटा देण्यात आला आहे.

वसमत : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना पदवीधर पदस्थापना देताना समुपदेशन व पारदर्शकतेला फाटा देण्यात आला आहे. पदस्थापना देताना राजपत्रातील नियमांचेही उल्लंघन करण्यात आले असून मोठी ‘शाळा’ झाल्याच्या तक्रारी शिक्षकांतून होत आहेत. पदस्थापना देण्याचे अधिकार जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असताना गटशिक्षणाधिकाऱ्यांने हा अधिकार वापरल्याने घोडेबाजार झाल्याच्या आरोपाला पुष्टी मिळत आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम २००९ नुसार तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना पदवीधर पदस्थापना व दर्जावाढ देण्यात आली आहे. तालुकास्तरावरच ही निवड प्रक्रिया ‘मोबाईल’ पद्धतीने पार पडली. शिक्षण विभागातील एजंट वजा शिक्षकांना जे शिक्षक भेटले. त्यांना अप-डाऊन करण्यासाठी सोयीच्या होतील, अशा शाळांवर पदस्थापना देण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे.वसमत तालुक्यात ७८ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली आहे. यात बी.एड., डी.एड. शिक्षकांवर अन्याय झाल्याची तक्रार आता होत आहे. राजपत्रात स्पष्टपणे पदस्थापनेचे नियम नमुद असताना वसमत येथे बीएडची सक्ती करण्यात आल्याचा आक्षेप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वसमत शाखेने लेखी स्वरुपात नोंदवला आहे.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात वसमत शिक्षण विभागाने जाहीर केलेली यादी रद्द करावी, समुपदेशानाद्वारे पारदर्शक प्रक्रिया पार पाडावी, कायदेशीरपणे सर्वाना न्याय मिळावा आदी मागण्या केल्या आहेत. निवेदनावर तालुकाध्यक्ष गजानन सायगन, पांडुरंग डांगे, शंकर पटवे, गंगाधर व्हडगीर, शिवानंद पटवे, के. एम. आहेर, पी. एस. बळवंते, एस. जी. भडके, राजू ठोके, पी. एस. जाधव, व्ही. बी. केंद्रे, पी. जी. निमजावकर, ए. एस. खतीब, एस. डी. कुंटूरवार, एल. एल. भालेराव, माळी, पी. एस. कऱ्हाळे, जे. जी. मोरे, के. जी. लोखंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.वसमत तालुक्यात शिक्षकांना पदस्थापना देण्याच्या प्रक्रियेत मोठा घोडेबाजार व आर्थिक उलाढाल झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. नियमांना तिलांजली देवून ‘भाव’ देणाऱ्यांना ‘रस्त्यावरचे गाव’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. वसमत शहरातील जिल्हा परिषद शाळेत एकच पद नियमानुसार मान्य असताना चार जणांना पदस्थापना देण्यात आली. गिरगाव केंद्रीय शाळेत पाच शिक्षक पदस्थापनेस पात्र होते. यातील एकाही शिक्षकाला शाळेत किंवा केंद्रात स्थान दिले नाही. यातील एकाने बिट बदलून पांग्रा शिंदेला वाढवले तर तिघांना केंद्र बदलून पळसगाव कन्या शाळा वसमत व कोठारी येथे पाठवण्यात आले आहे. शिक्षक अपंग असतानाही आणि त्याच केंद्रात जागा उपलब्ध असताना कोठारीसारख्या गैरसोयीच्या गावी त्याला पाठवण्यात आले आहे. या शिवाय पिंपराळा, सतीपांगरा, बाभुळगाव आदी शाळांच्या शिक्षकांवरही अन्याय झाल्याच्या तक्रारी आहेत. आसेगाव येथील शिक्षिकेला तेथे जागा असतानाही वसमत येथे घरापासून जवळ असलेल्या शाळेत सोयीचे ठिकाण पाहून पदस्थापना देण्यात आली आहे. हे प्रकार समुपदेशनाची ‘शाळा’ झाल्यानेच घडले आहेत. यासंदर्भात महात्मा ज्योतीराव फुले राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांनी जिल्हास्तरावरून, समुपदेशनाद्वारे सेवाज्येष्ठतेनुसार, पारदर्शक पद्धतीने पदस्थापना प्रक्रिया पार पाडावी, मनमानी पद्धतीने केलेली यादी रद्द करावी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात गटशिक्षणाधिकारी सुभाष बगाटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सोमवारी दुपारी १२ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत त्यांचा मोबाईल उत्तर देत नव्हता. वसमत येथील शिक्षण विभागात अनेक एजंट शिक्षक सक्रीय झाले आहेत. त्यांच्या कारवायांनी कोणाचे पाठबळ नसलेले शिक्षक त्रस्त झाल्याच्याही तक्रारी आहेत. (वार्ताहर)सीईओऐवजी बीईओने वापरले अधिकारबालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम २००९ नुसार तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना पदवीधर पदस्थापना व दर्जावाढ देण्यात आली आहे. तालुकास्तरावरच ही निवड प्रक्रिया ‘मोबाईल’ पद्धतीने पार पडली. शिक्षण विभागातील एजंट वजा शिक्षकांना जे शिक्षक भेटले त्यांना अप-डाऊन करण्यासाठी सोयीच्या होतील, अशा शाळांवर पदस्थापना देण्यात आल्याचे चित्र आहे. वसमत तालुक्यात शिक्षकांना पदस्थापना देण्याच्या प्रक्रियेत मोठा घोडेबाजार व आर्थिक उलाढाल झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. नियमांना तिलांजली देवून ‘भाव’ देणाऱ्यांना ‘रस्त्यावरचे गाव’ हा उपक्रम राबविण्यात आला. सीईओंना पाठवलेल्या निवेदनात वसमत शिक्षण विभागाने जाहीर केलेली यादी रद्द करण्यासह इतर मागण्या करण्यात आलेल्या आहेत.