परंडा : येथील पालिका सभागृहात शनिवारी वॉर्डनिहाय आरक्षण सोडत प्रक्रिया उपविभागीय अधिकारी पवार यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी मिताली संचेती यांच्या उपस्थितीत पार पडली. या आरक्षण सोडतीचा उपनगराध्यंक्षासह काही नगरसेवकांनाही फटका बसल्याचे दिसून आले. आहे.परंडा नगरपरिषदेअंतर्गत आठ प्रभागातून १७ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. यावेळी १७ पैकी ९ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या. आरक्षण सोडतीचा फटका उपनगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल यांना बसला असून, त्यांच्या प्रभाग १ मधील १ अ वार्डमध्ये नामाप्र महिला आरक्षण पडले असल्याने त्यांना याच प्रभागातील १ ब मधून निवडणूक लढवावी लागणार आहे. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक मुकूल देशमूख यांनाही इतर वॉर्ड शोधावा लागणार आहे. विद्यमान नगराध्यक्षा राजश्री शिंदे यांचा वॉर्ड पुन्हा सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाला आहे. बैठकीला सर्वपक्षिय पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. (वार्ताहर)
उपनगराध्यंक्षासह नगरसेवक अडचणीत
By admin | Updated: July 3, 2016 00:28 IST