शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : एक्स-रेमधून कोरोनाचे होऊ शकते निदान?; घाटी रुग्णालयात अभ्यास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 16:56 IST

एक्स-रेतून निदान होणे शक्य झाले, तर त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे या अभ्यासातून नेमके काय समोर येते, याकडे आता लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देकोरोना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि संशयित रुग्णांच्या ५५० एक्स-रेंचे होतेय विश्लेषणस्वॅबऐवजी एक्स-रेतून कोरोनाचे निदान होऊ शकते का, याचाही अभ्यास केला जात आहे.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांचे एक्स-रेद्वारे निदान होऊ शकेल का आणि स्वॅब तपासणीला एक्स-रे पर्याय ठरू शकतो का, यासंदर्भात सध्या घाटीत क्ष-किरण विभागाकडून अभ्यास सुरू आहे. त्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि संशयित रुग्णांच्या ५५० एक्स-रेंचे विश्लेषण केले जात आहे.

घाटीत कोरोनाने बाधित तीव्र स्वरूपातील रुग्ण दाखल केले जात आहेत. त्यांच्यावरील उपचाराचे आव्हान घाटी पार पाडत आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे. दिवसरात्र येथील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवक प्रयत्न करीत आहेत. उपचाराबरोबर घाटीत संशोधन कार्यही सुरू आहे.

कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीतून सदर रुग्ण पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, याचे निदान केले जात आहे. स्वॅब तपासणीसह रुग्णालयात दाखल होणाऱ्या संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णाच्या छातीचा एक्स-रे काढला जातो. एक्स-रेतून रुग्णाच्या फुफ्फुसात झालेले बदल, निमोनिया आणि कोरोनाच्या विषाणूमुळे झालेल्या संसर्गाची तपासणी केली जाते. याच एक्स-रेचा आधार घेऊन क्ष-किरण विभागाकडून एक अभ्यास केला जात आहे. घाटीत कोरोना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि संशयित रुग्णांच्या ५५० एक्स-रेच्या सहाय्याने हा अभ्यास केला जात आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि संशयित रुग्णांच्या एक्स-रेत नेमका काय फरक होता, त्यातून नेमके काय समोर आले आणि रुग्णाच्या उपचारासाठी एक्स-रेचा कितपत फायदा झाला, याचे विश्लेषण केले जात आहे. त्यासोबतच स्वॅबऐवजी एक्स-रेतून कोरोनाचे निदान होऊ शकते का, याचाही अभ्यास केला जात आहे. 

...तर होईल फायदाएक्स-रेची सुविधा ही जागोजागी उपलब्ध असते. सध्या कोरोनाच्या संशयित रुग्णांचे निदान वाढावे, कोणीही पॉझिटिव्ह रुग्ण तपासणीपासून दूर राहू नये, यासाठी सर्वत्र प्रयत्न केला जात आहे. एक्स-रेतून निदान होणे शक्य झाले, तर त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे या अभ्यासातून नेमके काय समोर येते, याकडे आता लक्ष लागले आहे.

विश्लेषणातून होईल स्पष्टएक्स-रे हा स्वॅबला पर्याय ठरू शकतो, हे सध्यातरी म्हणता येणार नाही. कारण अद्याप ते शास्त्रोक्त नाही. मात्र, सध्या ५५० एक्स-रेंचा अभ्यास केला जात आहे. त्यातून किती फायदा झाला, एक्स-रेतून काय समोर आले, एक्स-रे स्वॅबला पर्याय होऊ शकेल का, हे या एक्स-रेंच्या विश्लेषणातून समोर येईल. -डॉ. वर्षा रोटे, क्ष-किरण विभागप्रमुख, घाटी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी