शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

coronavirus : चिंताजनक ! ‘हर्ड इम्युनिटी’पासून औरंगाबाद कोसो दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 16:52 IST

आगामी कालावधीत रुग्णसंख्या  आणखी झपाट्याने वाढण्याची भीती आहे. 

ठळक मुद्देमुंबई, पुण्याच्या तुलनेत नागरिकांमध्ये अँटीबॉडीचे प्रमाण अत्यल्पऔरंगाबादेत १२ टक्के नागरिकांत अँटीबॉडी आढळून आल्या आहेत.

औरंगाबाद : शहरातील १२ टक्के म्हणजेच १ लाख ७० हजार नागरिकांमध्ये कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती (अँटीबॉडीज) विकसित झाली; परंतु मुंबई, पुण्याच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. ‘हर्ड इम्युनिटी’पासून औरंगाबाद कोसो दूर असल्याने कोरोनाचा धोका कायम असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

मुंबई महापालिकेने केलेल्या सेरो सर्वेक्षणामध्ये  ५७ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटीबॉडी (प्रतिद्रव्ये) तयार झाल्याचे समोर आले होते, तर पुण्यातील ५० टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाच्या अँटीबॉडीज सापडल्या. एखाद्या ठिकाणी ४० ते ७० टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार होतात, त्यावेळी  ‘हर्ड इम्युनिटी’ विकसित होते. 

औरंगाबादेत १२ टक्के नागरिकांत अँटीबॉडी आढळून आल्या आहेत. प्राथमिक दृष्टीने ही बाब चांगली आहे; परंतु कोरोनाचा अद्यापही लांब पल्ला कायम असल्याचे हे संकेत आहेत. १२ टक्के नागरिकांत अँटीबॉडी आढळून आल्या. म्हणजे उर्वरित नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका कायम असल्याचे संकेत आहे. त्यामुळे आगामी कालावधीत रुग्णसंख्या  आणखी झपाट्याने वाढण्याची भीती आहे. 

किमान ५० टक्के प्रमाण हवेकिमान ५० टक्के नागरिकांमध्ये कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती (अँटीबॉडीज) विकसित झाली असती, तर हर्ड इम्युनिटी निर्माण झाली आहे. अजून तसे झालेले दिसत नाही. अँटीबॉडीजचे प्रमाण हे कमीच आहे.- डॉ. प्रभाकर जिरवणकर, औषधवैद्यकशास्त्र विभाग, घाटी.

रुग्णसंख्या वाढणारशहरात करण्यात आलेले सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. हर्ड इम्युनिटीकडे जात आहोत, असे दिसते. अँटीबॉडीजचे प्रमाण पाहता आगामी कालावधीत रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर रुग्णांचे प्रमाण कमी होईल, असे दिसते.- डॉ. आनंद निकाळजे, अतिदक्षता विभागतज्ज्ञ

धोका कायमसेरो सर्वेक्षणावरून लक्षणे नसताना रुग्ण बरे होऊन गेल्याचे दिसते. हे एक चांगले लक्षण आहे. नागरिकांनी आपोआप कोरोनावर मात केल्याचे दिसते; परंतु अँटीबॉडीजचे प्रमाण पाहता कोरोनाचा धोका हा अजूनही कायम आहे. लस येईपर्यंत हीच स्थिती राहू शकते.- डॉ. संतोष रंजलकर, अध्यक्ष, आयएमए  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद