शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : चिंताजनक ! औरंगाबादच्या ९ % भागाला कोरोनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 19:07 IST

येणारे १४ दिवस अत्यंत कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन गस्त वाढविणार आहे. 

ठळक मुद्देशहरात पोलिसांची गस्त वाढणार  १२ कंटेन्मेंट झोनवर निगराणी

औरंगाबाद : शहरात ९ टक्के भाग सध्या कोरोनाच्या विळख्यात आहे. १७३ चौरस किलोमीटरपैकी केवळ १४ चौरस किलोमीटर परिसरात कोरोनाचे रुग्ण आहेत. नवीन १२ कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कडक करण्याबाबतचा निर्णय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत आयुक्तालयात गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

शहरातील ९ टक्के क्षेत्र कोरोना बाधित झाले आहे. त्यामुळे शहरातील परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात आहे. सध्या असलेल्या कंटेन्मेंट झोनमधून कोरोनाचा प्रादुर्भाव इतरत्र होऊ नये यासाठी लॉकडाऊन अधिक कडक करण्यात येईल. येणारे १४ दिवस अत्यंत कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन गस्त वाढविणार आहे. कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची नोंदही घेणार आहे.

जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, मनपाचे शहर अभियंता एस. डी. पानझडे, आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, टास्क फोर्स पथकप्रमुख विधि सल्लागार अपर्णा थेटे यांची होती.

बैठकीत झालेले निर्णय असे कंटेन्मेंट झोनच्या सीमा सील करणार, नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी राहणार, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करणार, पोलिसांची पेट्रोलिंग वाढविणार, झोनमधून ये-जा करणऱ्यांची नोंद ठेवली जाणार, आरोग्य पथकामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार, समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक यांना सोबत घेऊन नागरिकांशी संवाद साधणार, दुचाकी, चारचाकी वाहनांना बंदी घालणार, ज्येष्ठ नागरिकांना घरपोच आरोग्य सुविधा पुरविणार, बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करणार, या भागाचा दररोज अहवाल घेण्याबाबत कार्यवाही यापुढे करण्याबाबतचा निर्णय झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद