शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

coronavirus : प्राध्यापिकेच्या संपर्कातील महिला आणि इतर पाच संशयित रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 19:33 IST

सदर प्राध्यापिका ज्या शैक्षणिक संस्थेत कार्यरत आहेत, तेथील विद्यार्थी, कर्मचारी अशा ५०० जणांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतपासणीसाठी घेतले स्वॅबखाजगी रुग्णालयातील प्राध्यापिकेची प्रकृती स्थिर

औरंगाबाद : शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केलेल्या कोरोना पॉझिटिव्ह प्राध्यापिकेची प्रकृती स्थिर असून, आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू आहे. दुसरीकडे या प्राध्यापिकेच्या संपर्कातील ३६ वर्षीय महिलेला सोमवारी कोरोनाच्या संशयावरून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या महिलेचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला आहे. तसेच इतर पाच संशयित सुद्धा रुग्णालयात भरती झाले असून, त्यांचा अहवाल नेमका काय येतो, याकडे आरोग्य अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापिकेचा कोरोना तपासणीचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आणि आरोग्य यंत्रणा कामाला लागली. या प्राध्यापिकेच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा शोध घेऊन लक्षणांवरून संशयित रुग्णांचा शोध घेतला जात आहे. यामध्ये प्राध्यापिकेशी अगदी जवळून संपर्क आलेल्या महिलेला जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी आवश्यक ती तपासणी केल्यानंतर तपासणीसाठी महिलेचा स्वॅब पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) ला पाठविण्यात आला आहे. या महिलेच्या पतीचीही तपासणी करण्यात आली. परंतु त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले. 

घाटी आणि जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यापाठोपाठ सोमवारी ६२ वर्षीय महिलेचाही कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. कोरोनासंदर्भात आतापर्यंत तिघांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर एकाचा पॉझिटिव्ह आला. आता सोमवारी दाखल झालेल्या महिलेच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. ही महिला पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील असल्याने अहवाल नेमका काय येतो, याकडे आरोग्य अधिकाऱ्यांचे डोळे लागले आहेत. यासोबतच परदेशातून आणि शहराबाहेरील पाच जणांचे सुध्दा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

प्राध्यापिकेवर औषधोपचार सुरूप्राध्यापक महिलेवर अ‍ॅन्टी रिट्रो व्हायरल थेरपी (एआरटी) उपचार करण्यात येत आहेत. आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार औषधोपचार केले जात आहेत. महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.

शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांची तपासणीसदर प्राध्यापिका ज्या शैक्षणिक संस्थेत कार्यरत आहेत, तेथील विद्यार्थी, कर्मचारी अशा ५०० जणांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे. कोणामध्येही लक्षणे दिसून आली नाहीत. ज्यांना काही त्रास होत असेल, त्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहन करण्यात आले. कोरोनाची लक्षणे निदर्शनास येण्यास १४ दिवसांचा कालावधी महत्त्वाचा ठरतो.  प्राध्यापिका ५ मार्च रोजी संस्थेत गेल्या होत्या. त्यामुळे १९ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांनी वसतिगृहातून बाहेर पडू नये, अशीही सूचना करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी घरी जाण्यासाठी तिकीट बुक केले होते. ही तिकीट रद्द करण्याचेही आदेश आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. प्राध्यापिकेला कोरोना झाल्याचे समजताच संस्थेत स्वच्छतेपासून अनेक खबरदारी घेण्यात येत आहे. रुमाल, मास्क बांधूनच कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे. याठिकाणी रुग्णवाहिका सज्ज ठेवल्याचेही पाहायला मिळाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद