शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : 'आमच्याकडे आता काही उरले नाही'; पैठणमधून ४० मजुर पायी निघाले मध्यप्रदेशकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 19:43 IST

हाताला काम व पोटाला अन्न उरले नाही

ठळक मुद्दे२० किमीचा पायी प्रवास केल्यानंतर प्रशासनाने रोखलेसर्व व्यवस्था करतो याची हमी दिल्यानंतर परतले

पैठण : हाताला काम व पोटासाठी अन्न उरले नाही म्हणून पैठण औद्योगिक वसाहतीतून पायी मध्यप्रदेशकडे निघालेल्या मजुरांना चितेगाव येथून पुन्हा परत फिरावे लागले आहे.धनगाव ते चितेगाव असा २० किमी  पायी प्रवास केल्यानंतर चितेगाव येथून रस्त्याने जात असलेला ४० मजुरांंचा जथ्था पाहून एका दक्ष नागरिकांने या बाबत तहसील प्रशासनास माहिती दिली. माहिती मिळताच तातडीने कारवाई करून  तहसील प्रशासनाने मजुरांना  धनगाव येथे परत आणले. आमच्या जवळ आता काही राहिले नाही, आम्हाला जाऊ द्या अशी विनवणी मजुर करत होते. तुमची सर्व व्यवस्था करू, तुम्ही परत फिरा असा विश्वास प्रशासनाने दिल्यानंतर मजुर परत येण्यास तयार झाले.

मध्यप्रदेश राज्यातील शेंदवा जिल्हा बडवाणी येथील ४० मजुर परिवारासह डिसेंबर २०१९ मध्ये पैठण तालुक्यातील  धनगाव येथील भंडारी प्राईम कॉटन ईंडस्ट्रीज अँड ऑईल मील मध्ये कामासाठी आले होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम बंद पडले व मजुरांना लॉकडाऊन परिस्थितीत मीलमध्येच रहावे लागले. लॉकडाऊन उठल्यानंतर आम्ही  आमच्या गावाकडे जाणार होतो, परंतु, लॉकडाऊन वाढल्याने आम्ही खचलो आहोत, असे या मजुरांचा प्रमुख असलेल्या मोहन मेहता याने सांगितले. लॉकडाऊन वाढले, जवळचा पैसा थोडाच शिल्लक राहिला, कुणी मदत करेल ही आशा लोप पावली. शेवटी आम्ही दि १२ रोजी पाठिवर संसार घेऊन पायी मध्यप्रदेश मध्ये जाण्यास निघालो होतो असे मोहन मेहता यांनी सांगितले. 

चितेगाव परिसरात रस्त्याने पायी जात असलेल्या  महिला, पुरूष व बालके यांना पाहून चितेगावचे दक्ष नागरिक निलेश राजापुरे यांनी पैठण तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना या बाबत माहिती दिली. तहसीलदार शेळके यांनी चितेगावचे मंडळ अधिकारी संभाजी थोटे व तलाठी श्रीधर जमादार यांना तातडीने घटनास्थळी पाठवून सर्व मजुरांना परत आनण्याच्या सूचना दिल्या. मंडळ अधिकारी थोटे, तलाठी जमादार यांनी सर्व मजुरांना कोरोना बाबतीत माहिती देवून एका वाहनाने परत धनगाव येथील भंडारी मील मध्ये आणले. या मजुरांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. लॉकडाऊन संपल्यानंतर  आपल्या राज्यात आपल्या गावी परत जाऊ या आशेवर तग धरून बसलेल्या परप्रांतीय मजुरात लॉकडाऊन वाढल्याने मोठी अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे दिसून आले आहे. 

अडचण असल्यास मला कळवादरम्यान, मजुरांना परत आणल्या नंतर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मजुरांची भेट घेऊन काही अडचण असेल तर मला कळवा असे सांगत त्यांना स्वतः चा मोबाईल क्रमांक दिला. या मजुरांच्या अडचणी सोडविण्यात येतील असे तहसीलदार  यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद