शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : परवानगी अभावी गंभीर रुग्णांना प्लाझ्मा थेरपीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 19:17 IST

कोरोना रुग्णांच्या उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन उमेद जागविली आहे.

ठळक मुद्दे५० लिटर प्लाझ्मा संकलनाचे लक्ष्य परवानगी मिळताच प्रत्यक्ष रुग्णांना प्लाझ्मा देण्यास सुरुवात

औरंगाबाद : घाटीत कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार केले जाणार आहेत. यासाठी अद्यापही  ‘आयसीएमआर’ आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर)  परवानगीची प्रतीक्षा आहे. ही परवानगी मिळताच प्रत्यक्ष रुग्णांना प्लाझ्मा देण्यास सुरुवात होणार आहे.

कोरोना रुग्णांच्या उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन उमेद जागविली आहे. त्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे प्लाझ्मा गंभीर रुग्णांना देण्यात येतात. त्यासाठी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे प्लाझ्मा संकलित केले जात आहेत. घाटीत किमान ५० लिटर प्लाझ्मा संकलनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. कोरोनातून बरे झालेल्या एका रुग्णाकडून ४०० मिलिलिटर प्लाझ्मा संकलन करता येते. यानुसार १२५ दात्यांकडून याचे संकलन केले जाणार आहे. त्यासाठी १३६ दात्यांबरोबर घाटीने संपर्क केला आहे. आतापर्यंत ७ दात्यांनी  प्लाझ्मा दान केले आहे. यातून २ लिटर ८०० मिलिलिटर प्लाझ्मा संकलन झाले आहे.गंभीर रुग्णांना २०० मिलिलिटर कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्माचे २४ तासांच्या अंतरात दोन डोस दिले जातील. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्मामध्ये कोरोना विषाणूविरुद्ध अँटिबॉडी असतात. ज्यामुळे संक्रमणाविरुद्ध प्लाझ्मा मिळालेल्या गंभीर रुग्णांना आजाराशी लढण्यास मदत होते. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लाझ्मा थेरपीसाठी प्रयत्न सुरू आहेत. १५ आॅगस्टपर्यंत प्लाझ्मा देण्यास सुरुवात होईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद