शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोनासाठी दक्षता; शनिवार, रविवार औरंगाबादची बाजारपेठ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 19:10 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयाचे पालकत्व स्वीकारले व्यापारी महासंघाने

ठळक मुद्देबाजारपेठेत ५० ठिकाणी लिक्विड वॉश सोपची व्यवस्था 

औरंगाबाद : कोरोना व्हायरस रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाने शनिवार (२१ मार्च) व रविवार (२२ मार्च) रोजी शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यातून औषधी व्यावसायिकांना वगळण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली. 

चिकलठाण्यात  जिल्हा सामान्य रुग्णालयाचे पालकत्वही महासंघाने स्वीकारले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यास त्यांच्यासाठी तिथे खाटापासून वैद्यकीय साहित्य पुरविण्याची जबाबदारी घेण्यात आल्याचेही त्यांनी दिली. कोरोनाशी लढा देण्यासाठी जिल्हा व्यापारी महासंघ प्रशासनासोबत काम करण्यास सज्ज झाला आहे. यासंदर्भात महासंघाची बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. यात शहरातील ७२ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, सचिव सहभागी झाले होते. या बैठकीत कोरोनासंदर्भात प्रशासनाला कशा प्रकारे मदत करता येईल, याविषयी सर्वांनी आपले विचार मांडले.

यावेळी महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार, मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, कॅमिटचे मराठवाडाचे उपाध्यक्ष अजय शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. यासंदर्भात महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. व्यापारी महासंघही प्रशासनाच्या सोबत काम करण्यास सज्ज झाला आहे. या बंदमध्ये २५ हजार व्यापारी आपली दुकाने बंद ठेवणार आहेत. या बंदमधून औषधी विक्रेत्यांना वगळण्यात आले आहे. परिस्थिती लक्षात घेऊन व जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याशी संवाद साधून पुढील निर्णय घेण्यात येईल. 

चिकलठाणा येथील  जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. येथे  गरजेनुसार खाटांची व्यवस्था करणे, विशेष कक्ष तयार करणे, वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करणे आदींची जबाबदारी जिल्हा व्यापारी महासंघाने घेतल्याचेही काळे यांनी सांगितले. या बैठकीला सचिव लक्ष्मीनारायण राठी, सरदार हरिसिंग, विजय जैस्वाल, जयंत देवळाणकर, गुलाम हक्काणी, कचरू वेळजकर यांच्यासह ७२ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, सचिव हजर होते.

बाजारपेठेत ५० ठिकाणी लिक्विड वॉश सोपची व्यवस्था जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने शहरातील विविध भागांतील ५० ठिकाणी लिक्विड वॉश सोप आणि पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. जेणेकरून बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना आपले हात धुता येतील. यात पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरा, सिटीचौक, शाहगंज, क्रांतीचौक, उस्मानपुरा, जवाहर कॉलनी, पुंडलिकनगर, सिडको हडको, मुकुंदवाडी, चिकलठाणा, हर्सूल आदी भागांचा समावेश असणार आहे.  लिक्विड वॉश सोप उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्या भागातील व्यापारी संघटनांवर सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय