शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : व्हेंटिलेटर सरकारचे; बिल खाजगी रुग्णालयाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 19:24 IST

सर्व खाजगी रुग्णालयांवर ऑडिटर नेमण्याची लोकप्रतिनिधींची प्रशासनाकडे मागणी

ठळक मुद्देपी. एम. केअर फंडातून जिल्ह्याला ६५ व्हेंटिलेटर मिळालेयातील ३० व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना वाटले

औरंगाबाद : केंद्र शासनाने दिलेले ६५ पैकी ३० व्हेंटिलेटर  तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी खाजगी रुग्णालयांना वाटले आहेत. सरकारी व्हेंटिलेटरवरून ज्या रुग्णांचा उपचार झाला त्यांच्या बिलात त्याची रक्कम आकारण्यात येऊ नये, या अटीवर ते व्हेंटिलेटर देण्यात आलेले असताना खाजगी रुग्णालये बिल आकारत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत केल्या. जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयांवर आॅडिटर नेमण्याची मागणीदेखील यावेळी करण्यात आली. 

पी. एम. केअर फंडातून जिल्ह्याला ६५ व्हेंटिलेटर मिळाले, ते व्हेंटिलेटर कधी आले, कोणत्या रुग्णालयांना वाटले, याबाबत प्रशासनाला काहीही माहिती नव्हती. वाटप केल्यानंतर जिल्हा प्रशासनासमोर ती बाब आली. जेथे त्या व्हेंटिलेटरची गरज नाही, त्या ठिकाणी ते वाटप करण्यात आले. ज्या रुग्णालयात आयसीयू नाही, तेथे व्हेंटिलेटर दिले. कोरोना रुग्णावर उपचार करण्याची तयारी ज्या हॉस्पिटल्सने दर्शविली, त्यांना ते वाटप करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून जिल्हा प्रशासनाला सांगण्यात आले. ३ महिन्यांसाठीच ते व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी कोरोनाचे २ किंवा ४ रुग्ण आहेत, तेथे १०-१० व्हेंटिलेटर देण्यात आले. गरज नसलेल्या ठिकाणचे व्हेंटिलेटर काढून घेत त्यातील २५  व्हेंटिलेटर घाटीला देण्यात आले. 

 उर्वरित एमजीएम, सावंगीकर, वायएसके, एमआयटी रुग्णालयांना देण्यात आले आहेत. या रुग्णालयांना अटी व शर्ती टाकून ते व्हेंटिलेटर दिले असून, कोरोना रुग्णांवर उपचार करताना सरकारी व्हेंटिलेटर वापरले तर त्याचे बिल घेण्यात येऊ नये, असे आदेश तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. सोमवारी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, पुढच्या सोमवारपर्यंत याबाबत चित्र स्पष्ट होईल, अशी लोकप्रतिनिधींनी नंतर माध्यमांशी बोलताना अपेक्षा व्यक्त केली. 

केवळ पाच खासगी रुग्णालयात रिअल टाईम बिल तपासणीजिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत व्हेंटिलेटर आणि खाजगी रुग्णालयांकडून जास्तीचे बिल आकारण्यात येत असल्याबाबत सोमवारी चर्चा झाली. यामध्ये व्हेंटिलेटर जेथे दिले त्या रुग्णालयांकडून बिल आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत, तसेच केवळ पाच खाजगी रुग्णालयांमध्ये रिअल टाईम बिल तपासणी होत असून, सर्व खाजगी रुग्णालंयावर ऑडिटर नेमला जावा, अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केल्याचे आ. अंबादास दानवे यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद