शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक... औरंगाबादेत एकाही ‘आयसीयू’त बेड शिल्लक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 16:42 IST

शहरातील ४०० ते ५०० गंभीर रुग्णांना अत्याधुनिक सुविधा व उपचारांची गरज आहे;

ठळक मुद्देगंभीर रुग्णांचे होत आहेत हाल १५ लाख लोकसंख्येसाठी फक्त ३२६ आयसीयू बेड 

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : शहर आणि परिसरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, गंभीर रुग्णांचे प्रमाणही चारपट झाले आहे. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी आयसीयू बेडची नितांत गरज असताना एकाही रुग्णालयात आयसीयू बेड उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब मंगळवारी निदर्शनास आली. आता आयसीयूमध्ये बेड वाढवायचे तरी कसे, असा प्रश्न रुग्णालयांसह प्रशासनाला भेडसावत आहे. 

सध्या शहरी भागातील ३ हजार ७२० बाधितांवर उपचार सुरू आहेत. यातील ४०० ते ५०० गंभीर रुग्णांना अत्याधुनिक सुविधा व उपचारांची गरज आहे; परंतु खाजगी आणि शासकीय रुग्णालयांमधील आयसीयू कक्ष फुल झाले आहेत. त्यामुळे काही गंभीर रुग्णांना सामान्य कक्षात आॅक्सिजन लावून ठेवले आहे. ‘लोकमत’ने सर्व रुग्णालयांचा आढावा घेतला असता अत्यंत गंभीर बाबी समोर आल्या. मागील २४ तासांपासून शहरातील एकाही रुग्णालयात आयसीयू बेड शिल्लक नाही. या स्थितीत एखाद्या रुग्णास श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्याला कुठे हलविणार? घाटीसह खाजगी रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांना फक्त आॅक्सिजन लावून उपचार केले जात आहेत. दरम्यान कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत अशा रुग्णांवर घरातच उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालयांनी पॅकेज पद्धतीचा अवलंब केल्यास रुग्णालयांमध्ये होणारी गर्दी कमी होईल, असा विश्वास विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी एका बप्तठकीत व्यक्त केला. 

६ महिन्यांत तयारी शून्यकोरोनाचा संसर्ग मागील ६ महिन्यांपासून थैमान घालत आहे. जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने बाधितांसाठी मोठ्या प्रमाणात बेड उपलब्ध करून दिले. मात्र, गंभीर रुग्णांसाठी बेडची संख्या वाढविली नाही. आता अचानक शहरातील सर्व रुग्णालयांमधील आयसीयू कक्ष हाऊसफुल झाल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडले आहेत. 

ऑक्सिजनचाही तुटवडा : महापालिकेतर्फे चिकलठाणा येथे मेल्ट्रॉन हॉस्पिटल चालविण्यात येत आहे. तेथे २४० रुग्ण उपचार घेत आहेत. बहुतांश रुग्णांना आॅक्सिजनची गरज भासत आहे. मागील ५ दिवसांपासून आॅक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून विलंब होत आहे. असाच त्रास शहरातील इतर खाजगी रुग्णालयांना सहन करावा लागत आहे.

शहराची आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवररुग्णालय     क्षमता     रुग्ण     आयसीयू बेड    शिल्लकएमजीएम     २५२    २३०    ६३    ०धूत    ९०    ९०    १५    ०बजाज    ४५    ४५    १०    ०हेडगेवार    ६५    ६५    १०    ०सिग्मा    ३५    ३५    ०५    ०एम्स    ३५    ३५    ०३    ०आशिष    १४    ०५    २०    ०लाईफ लाईन    २४    २६    ०४    ०सावंगीकर    २०    २०    ०४    ०वाय.एस. खेडकर    ६०    ४२    १०    ०एशियन    ४०    ४३    ०७    ०ओरियन    ३५    ३५    ०५    ०धनवई     १४    ०७    ०२    ०घाटी    ४५८    ३००    १२८    ०सिव्हिल हॉस्पिटल    २००    २०५    १०    ०मेल्ट्रॉन    २४०    २४०    ३०    ०  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद