शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : धक्कादायक ! सिल्लोड तालुक्यात क्वारंटाईन केलेल्या युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 20:08 IST

ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असून शनिवारी सकाळी अग्निशमन दलाच्या पथकाने युवकाचा मृतदेह शोधून काढला.

ठळक मुद्देयुवकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

सिल्लोड: तालुक्यातील  तळणी येथील क्वारंटाईन केलेल्या एका २७ वर्षीय युवकाने खदानीतील पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असून शनिवारी सकाळी अग्निशमन दलाच्या पथकाने युवकाचा मृतदेह शोधून काढला. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव  पंजाब सुंदरसिंग ठाकूर असे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंजाब ठाकूर हा औरंगाबाद येथून तळणी येथे घरी आला असता त्याला कुटुंबाने शेतात क्वारंटाईन केले. शुक्रवारी दुपारी पंजाब भावासह दुचाकीवरून तळणी शिवारातील मंदिराकडे जात होता. यावेळी अचानक दुचाकी उभी करुण पंजाबने रस्त्यालगतच्या खदानीतील पाण्यात उडी मारली. उडी मारताच त्याच्या भावाने आरडा- ओरड केली. शेजारील शेतकरी मदतीला धावुन येईपर्यंत पंजाब पाण्याच्या तळाशी बुडाला होता. या घटनेची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना मिळताच सहायक पोलिस उपनिरीक्षक  किरण बिडवे, विलास आडे, मुश्ताख शेख, देवीदास जाधव, काकासाहेब सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने बराच शोध घेतला, पण पाणी आधीक खोलवर असल्याने रात्री उशिरा पर्यंत मृतदेह मिळून आला  नव्हता. 

अग्निशमनदलास पाचारण यंदा तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याने सर्व जलसाठे तुडुंब भरले होते. यामुळे खदानीतही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असून मृतदेह सापडण्यास अडचण येत आहे. पोलिसांनी अग्निशमन दलास पाचारण केले. शनिवार सकाळी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सकाळी  8 वाजेच्या दरम्यान पथकाला मृत्यूदेह शोधण्यास यश आले. यावेळी अग्निशामक दलाचे मोहन मुंगसे,  सुभाष दुधे, परेश दूधे, प्रसाद शिंदे, इरफान पठान, विक्रम भुईगल, किरण पागोरे,तुषार तौर, दिनेश मूंगसे यांनी परिश्रम घेतले.

आत्महत्येचे कारण कळाले नाही सदर  युवक आठ दिवसांपूर्वी औरंगाबाद येथुन  तळणी गावात आला होता. औरंगाबाद येथून आल्याने  त्याची आरोग्य तपासणी करून कुटुंबाने त्यास होम क्वारंटाईन केले होते. दर्शनाला जाताना अचानक त्याने पाण्यात उडी घेतली यामुळे नेमके आत्महत्येचे कारण कळाले नाही. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद