शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : गंभीर कोरोना रुग्ण पुण्याहून थेट औरंगाबादेत; राज्यातील अनेक शहरांतील रुग्णांवरही शहरात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 14:57 IST

coronavirus: औरंगाबादेतील आरोग्य यंत्रणा ही केवळ जिल्ह्यातील रुग्णांवर नव्हे तर राज्यभरातील कोरोना रुग्णांवर उपचाराची जबाबदारी पार पडत आहे.

ठळक मुद्देशहरात अहमदनगरहून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापुढे आता पुण्यातील रुग्णही शहरात दाखल होत आहे. रुग्णालयाने उपचार शक्य नसल्याचे म्हटल्याने रुग्णास पुण्याहून औरंगाबादेत दाखल केल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.

औरंगाबाद : राज्यातील अनेक शहरांत कोरोना रुग्णांना उपचारासाठी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यातुलनेत औरंगाबादची परिस्थिती अनेक पटीने चांगली आहे. त्यामुळेच मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांतील रुग्ण औरंगाबादेत धाव घेत आहेत. आता तर कोरोना रुग्ण थेट पुण्याहून शहरात दाखल होत असल्याची स्थिती पहायला मिळत आहे.

औरंगाबादेतील आरोग्य यंत्रणा ही केवळ जिल्ह्यातील रुग्णांवर नव्हे तर राज्यभरातील कोरोना रुग्णांवर उपचाराची जबाबदारी पार पडत आहे. घाटी, जिल्हा रुग्णालयासह शहरातील खाजगी रुग्णालयांत मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यांतील कोरोना रुग्ण भरती होत आहे. एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर रेफर केले जाते, तर रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होईल, या आशेने काही जण उपचारासाठी औरंगाबादला येत आहेत. पण औरंगाबादेत अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या बहुतांश रुग्णांची प्रकृती गंभीर राहत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे अशा रुग्णांसाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात. शहरात अहमदनगरहून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापुढे आता पुण्यातील रुग्णही शहरात दाखल होत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. मुंबई पेक्षाही सर्वाधिक कोरोना रुग्ण हे पुण्यात आढळून आले. रुग्णालयाने उपचार शक्य नसल्याचे म्हटल्याने रुग्णास पुण्याहून औरंगाबादेत दाखल केल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.

रुग्णालय म्हणते, कुठेही घेऊन जापुण्यातील रुग्णालयाने आमच्याकडे उपचार होणार नाही, कुठेही घेऊन जा, असे सांगितले. त्यामुळे भावाला औरंगाबादेतील खाजगी रुग्णालयातील आयसीयूत दाखल केले. इथे दोन दिवसांत त्याची प्रकृती सुधारली. आम्ही आशाच सोडून दिली होती, पण भाऊ सुखरुपपणे घरी परतला. डाॅक्टरांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले.- रेवती सोनार, रुग्णाची बहीण

गंभीर अवस्थेत दाखलआमच्याकडे उपचार होत नाही, असे म्हटलेले पुण्याच्या रुग्णालयातील कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. गंभीर अवस्थेतील काहींची ऑक्सिजन पातळी ४० ते ५० होती. आतापर्यंत पुण्यातील ३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. प्रकृती सुधारल्याने त्यांना सुटी देण्यात आली. सध्या एका रुग्णावर उपचार सुरु आहे.- डाॅ. उज्ज्वला दहिफळे

रुग्ण कुठलाही असला तरी उपचाररुग्ण कोणत्याही जिल्ह्यातील असला तरी त्यास उपचारासाठी दाखल करून घेण्यास प्राधान्य दिले जाते. रेमडेसिविर लागत असेल तर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करता येईल. रुग्णालयात पुरेशा प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध आहे.- डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद