शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादेत २६ हजारांहून अधिक नागरिकांच्या लाळेचे नमुने; ६ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 20:02 IST

महापालिकेने मागील काही दिवसांपासून कोरोना टेस्टवर सर्वाधिक भर दिला आहे.

ठळक मुद्देआता दोन प्रकारची तपासणी

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंत २६ हजारांहून अधिक नागरिकांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले आहेत. एका नमुन्याच्या तपासणीसाठी तब्बल २,२०० रुपये खर्च येत आहे. आतापर्यंत ५ कोटी ७७ लाख ८ हजार रुपये खर्च आला आहे.

महापालिकेने मागील काही दिवसांपासून कोरोना टेस्टवर सर्वाधिक भर दिला आहे. मंगळवारी तब्बल एक हजार नागरिकांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले होते. त्यातील १६६ नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामध्येही औरंगाबाद शहरातील नागरिकांची संख्या ९९ एवढी होती. ज्या भागात रुग्ण आढळून येत आहेत, त्या परिसरात किमान पाचशे मीटरपर्यंत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या लाळेचे नमुने घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. असंख्य नागरिक लाळेचे नमुने देण्याचे टाळत आहेत. घराला कुलूप लावून अनेक जण पळून जात होते. १० जुलैपासून सुरू होणाऱ्या संचारबंदीत नागरिकांना पळून जाता येणार नाही. त्यामुळे महापालिकेने ५० हजार नागरिकांच्या लाळेचे नमुने घेण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. 

घाटी रुग्णालयात सर्वात कमी लाळेचे नमुने घेण्यात येतात. महापालिका दररोज ८०० ते १,००० पर्यंत लाळेचे नमुने घेत आहे. महापालिकेला आता एका व्यक्तीच्या लाळेचे नमुने घेण्यासाठी फक्त २०० रुपये कीटचा खर्च येत आहे. घाटी रुग्णालयाला तपासणीसाठी २ हजार रुपये खर्च येत असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी दिली.

आता दोन प्रकारची तपासणीमार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कालपर्यंत महापालिका नाकातून आणि घशातून लाळेचे नमुने घेत होती. या नमुन्यांची तपासणी घाटी रुग्णालयात करण्यात येत आहे. या तपासणीचा खर्च महापालिकेला पूर्वी २०० रुपये येत होता. आता हा खर्च १०० रुपयांवर आला आहे. लॉकडाऊनमध्ये महापालिकेला लाळेचे नमुने घेणारे कीट २०० रुपयांमध्ये भेटत होते. कोरोना टेस्टची दुसरी नवीन पद्धत अँटिजन टेस्ट बुधवारपासून सुरू करण्यात आली. या प्रकारामध्ये रुग्णाच्या लाळेचे नमुने घेतल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात अहवाल प्राप्त होतो. यामध्ये एका टेस्टचा खर्च फक्त ५०० रुपये आहे. ५० हजार टेस्टचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद