शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus औरंगाबादेत नव्या बाधितांची रेकॉर्ड ब्रेक वाढ : १६३ रुग्णांची भर, एक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 10:16 IST

एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३८१९ झाली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी सकाळच्या सत्रात आतापर्यंतची रेकोर्ड ब्रेक रुग्णांची वाढ झाली. तब्बल १६३ रुग्णांची भर पडून एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३८१९ झाली आहे. तर एक मृत्यू झाल्याने मृतांचा आतापर्यंतचा आकडा २०३ झाल्याचे प्रशासनाने कळवले आहे.

वाढलेल्या रुग्णांपैकी ११२ रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून ५१ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यापैकी २००५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २०३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १६११ रुग्णांवर उपचार सुरू आहे. रुग्ण संख्येचा रोज नवा उच्चाक गाठला जात असून मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यातील कोरोना संक्रमण चिंतादायी बनले आहे.

शहरी भागातील आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात आढळलेल्या शहरात शिवाजी नगर ४, सिडको एन चार, जय भवानी नगर १, बौद्ध नगर, जवाहर कॉलनी १, शिवशंकर कॉलनी ४, बायजीपुरा १, हमालवाडी, रेल्वे स्टेशन परिसर १, सिडको १, तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी १, उत्तम नगर १, समर्थ नगर १, म्हाडा कॉलनी १, अरिफ कॉलनी १, कोटला कॉलनी १, उस्मानपुरा १, एन नऊ सिडको ३, अंबिका नगर १, पडेगाव १, भानुदास नगर ७, न्यू नंदनवन कॉलनी १, विष्णू नगर १, उल्का नगरी १, पद्मपुरा ५, क्रांती नगर १, नागेश्वरवाडी २, नक्षत्रवाडी १, एन पाच सिडको २, एन सहा, मथुरा नगर ३, गजानन नगर ६, औरंगपुरा १, जय भवानी नगर ८, एन सहा, संभाजी कॉलनी १, नानक नगर १, शिवनेरी कॉलनी, गारखेडा १, म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ १, एन सहा सिडको २, सेवा नगर हाऊसिंग सोसायटी १, राज हाइट, सेव्हन हिल जवळ १, जे सेक्टर, मुकुंदवाडी १, भगतसिंग नगर ३, विठ्ठल नगर, मुकुंदवाडी १, कॅनॉट प्लेस १, न्यू विशाल नगर १, श्री साईयोग हाऊसिंग सोसायटी १, राजेसंभाजी कॉलनी, जाधववाडी १, मुकुंदवाडी २, मयूर नगर १, आयोध्या नगर २, बौद्धवाडा चिकलठाणा १,  चिकलठाणा हनुमान चौक २, सुरेवाडी १, विजय नगर २, गारखेडा परिसर १, रशीदपुरा १, जय गजानन नगर १, अन्य १, कैलास नगर १, एन दोन सिडको ३, जोहरीवाडा, गुलमंडी १, राजेसंभाजी नगर १, बन्सीलाल नगर १, रमा नगर १, हनुमान नगर २, सातारा परिसर १, मयूर पार्क १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

ग्रामीण भागातील रुग्णमांडकी २, सिडको महानगर दोन, वाळूज ४, सिद्धीविनायक हाऊसिंग सोसायटीजवळ, बजाज नगर २, राजतिलक हाऊसिंग सोसायटी बजाज नगर ५, ओयासिस चौक, पंढरपूर १, ग्रोथ सेंटरजवळ, बजाज नगर १, हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर २, सारा गौरव, बजाज नगर २, जय भवानी चौक, बजाज नगर १, एन अकरा, मयूर नगर, हडको २, पंचगंगा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर १, दीपज्योती हाऊसिंग सोसायटी बजाज नगर १, संजीव हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर १, बीएसएनएल गोदामाजवळ बजाज नगर १, वडगाव १, विराज हाईट, बजाज नगर १, दीपचैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर ३, भाग्योदय हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर १, करमाड ६, फत्तेह मैदान, फुलंब्री १, विवेकानंद कॉलनी, फुलंब्री १, कोलघर २, गजगाव, गंगापूर १, लासूर नाका,गंगापूर १, लक्ष्मी कॉलनी, गंगापूर १, शिवूर बंगला २, कविटखेडा, वैजापूर १, शिवूर ५, मधला पाडा, शिवूर, वैजापूर १ या भागातील कोरोनाबाधित आहेत. या रुग्णांमध्ये ५५ महिला आणि १०८ पुरुष बाधितांचा समावेश आहे.

कोरोनाबाधित वृद्धाचा मृत्यू

गोरखेडा येथील ६६ वर्षीय कोरोनाबाधित वृद्ध रुग्णाचा २३ जून रोजी मध्यरात्री १२.४५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील विविध खासगी रुग्णालयांत जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण ५४, घाटीमध्ये १४८ आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात एक अशा एकूण २०३ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद