शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादमध्ये एकाच दिवसात विक्रमी १० हजार टेस्ट; ८५ व्यापारी आढळले कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 13:39 IST

औरंगपुरा येथे सर्वाधिक २५ विक्रेत्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

औरंगाबाद : शहरात शनिवारी दिवसभरात विक्रमी ९ हजार ९०३ नागरिकांच्या कोरोना रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी २५२ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये ८५ व्यापाऱ्यांचा  समावेश आहे. औरंगपुरा येथील केंद्रावर सर्वाधिक २५  विक्रेते कोरोनाबाधित आढळले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. लॉकडाऊनच्या शेवटच्या दििवशी झालेली ही मेगा टेस्ट मोहीम महापालिकेच्या विविध केंद्रावर शनिवारी रात्री उशिरापर्यंत राबविण्यात आली. 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने शहरात  १० जुलै ते १८ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू केले होते. शनिवारी लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी महापालिकेने विविध केंद्रावर अँटिजेन पद्धतीच्या कोरोना टेस्टची मेगा मोहीम राबविली. शहरातील भाजीपाला, किराणा, चिकन, मटण, अंडी, दूध या विक्रेत्यांना रविवारपासून दुकाने उघडण्यासाठी कोरोना तपासणी करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे या तपासण्यासाठी  शहरात २२ ठिकाणी शिबिर घेण्यात आले, त्यात दिवसभरात ४२७४ विक्रेत्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात ८५ व्यापारी कोरोनाबाधित आढळून आल्याचा धक्कादायक अहवाल प्राप्त झाला. त्यांना तातडीने कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे.

या ठिकाणी होत आहेत अँटीजन टेस्ट :

व्यापाऱ्यांच्या तपासणी शिबिरात औरंगपुरा येथे २५, रामनगर येथे १४ आणि संभाजी कॉलनी येथे १४ व्यापारी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच महापालिकेने शहराच्या सीमेवर ६ चेक पॉईंट आणि इतर काही वसाहतींमध्ये सामान्य नागरिकांसाठीही तपासणी मोहीम राबविली. त्यात ५ हजार ६२९ लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी १६७ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद