शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ४५ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 17:30 IST

coronavirus in Aurangabad : सध्या जिल्ह्यात ६०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत 

ठळक मुद्देमंगळवारी ९२ कोरोना रुग्णांची वाढ दोघांचा मृत्यूआतापर्यंत १ हजार १९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४३ हजार २६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मंगळवारी नव्या कोरोनाबाधितांत थोडी वाढ झाली. दिवसभरात ९२ कोरोना रुग्णांची भर पडली असून, ६४ जण कोरोनामुक्त झाले. त्याचप्रमाणे २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ६४ झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ४३ हजार २६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १ हजार १९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ९२ रुग्णांत मनपा हद्दीतील ७६, ग्रामीण भागातील १६ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४४ आणि ग्रामीण भागातील २० अशा एकूण ६४ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. भावसिंगपुरा येथील ७३ वर्षीय पुरुष, भानुदासनगरातील ४४ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णशरनापूर, मिटमिटा  ३, सैनिक कॉलनी, पडेगाव २,  मयूरपार्क १,  जयभवानीनगर १,  गणेशनगर ३, एन-२ सिडको २, मुकुंदवाडी ४, पुंडलिकनगर ४,  म्हाडा कॉलनी  १,  वानखेडेनगर १,  विद्यानगर, सेवन हिल १, देवळाई रोड १,  ठाकरेनगर, एन-२, सिडको ३, एन-६ सिडको ३, नारेगाव, माणिकनगर २, हर्सूल टी पॉईंट १,  सातारा परिसर १, दिशानगरी, बीड बायपास १,  किराडपुरा १,  पदमपुरा १,  राजाबाजार १, शेंद्रा एमआयडीसी १,  रेल्वे स्टेशन परिसर २, अन्य ३२, हनुमाननगर १, कॅनॉट प्लेस १, अभिमान सोसायटी १. 

ग्रामीण भागातील रुग्णचितेगाव १,  सिल्लोड १,  खुलताबाद १, वडजी, डावरवाडी १,  अन्य १२.

रेल्वे स्टेशनवर सहा प्रवासी पॉझिटिव्ह महापालिकेची तीन पथके विमानतळ व रेल्वेस्टेशनवर २४ तास कार्यरत आहे. मंगळवारी दिवसभरात २७६ प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर सोमवारी केलेल्या चाचण्यांतून रेल्वेस्टेशनवरील ६ प्रवाशांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. मंगळवारी दिवसभरात रेल्वेस्टेशनवर सचखंड एक्स्प्रेसने आलेल्या एकूण २४७ प्रवाशांची कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद