शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शकक्तिशाली सॅटेलाईट
3
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
4
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
5
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
6
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
7
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
8
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
9
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
10
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
11
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
12
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
13
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
14
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
15
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
16
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
17
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
18
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
19
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
20
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 

coronavirus : कोणताही आजार नाही, वय कमी, तरीही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 19:47 IST

औरंगाबाद जिल्ह्यात १० जूनपर्यंत १ ते ४० या वयोगटात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या होती.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान रोज होणाऱ्या मृत्यूमुळे नागरिकांकडून चिंता

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : जिल्ह्यामध्ये जून महिन्यापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांत ज्येष्ठ नागरिकांची आणि हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार असलेल्या रुग्णांची संख्या मोठी होती; परंतु आता कमी वयात आणि कोणताही आजार नसतानाही रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात १० जूनपर्यंत १ ते ४० या वयोगटात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या होती. मार्च ते जून  या तीन महिन्यांत ६० टक्के रुग्ण या वयोगटातील होते. मात्र, सर्वाधिक रुग्णसंख्या असूनही, या वयोगटात मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी होते. यादरम्यान ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. कारण वयाच्या पन्नाशीनंतर आणि वृद्धापकाळात अनेक आजारांना सामोरे जावे लागते. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजारांमुळे कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती गंभीर होते. एकाच वेळी अनेक आजारामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने मृत्यू ओढवत असल्याची परिस्थिती दिसून आली.

कोरोनाचा ज्येष्ठ नागरिकांना आणि इतर आजार असलेल्या रुग्णांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जात होते, पण ज्येष्ठांबरोबर आता कमी वयातील म्हणजे ५० वर्षांखालील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यातही इतर कोणताही आजार नसतानाही रुग्णांची प्रकृती गंभीर होऊन मृत्यू ओढावत आहे. एक, दोघांपुरता हा प्रकार झालेला नसून, कमी वयात आणि कोणतेही आजार नसताना अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील चिंता वाढली आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. मात्र, रोज होणाऱ्या मृत्यूमुळे शहरातील नागरिकांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे. 

मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्नमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ग्रामीण भागांत सर्वेक्षणाचे काम चालू आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर म्हणाले, कोरोनाचा संसर्ग किती प्रमाणात झाला आणि रुग्णाची प्रतिकारशक्ती यावर सर्व अवलंबून असते.  कमी वयात मृत्यूचे प्रमाण सध्यातरी कमी आहे.

काही रुग्णांची स्थिती१ सप्टेंबर रोजी दाखल के लेल्या हिमायतबागमधील २८ वर्षीय पुरुषाचा २ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. या रुग्णास कोणतीही सहविकृती नव्हती. आसेगाव-गंगापूर येथील ३३ वर्षीय पुरुषाचाही २ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यालाही इतर कोणते आजार नव्हते. अशीच स्थिती ग्रामीण आणि शहरात अनेकांच्या बाबतीत पाहायला मिळाली.

ग्रामीण भागातील मृत्यूची परिस्थितीवय    रुग्णसंख्या१ -१०    १११-२०     ०२१-३०    ७३१-४०    १४१-५०    २१५१-६०    ३१६१-७०    ४२७१-८०    २६८० वर्षांवरील     ८एकूण    १३७ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद