शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ‘ते’ व्हेंटिलेटर्स नादुरुस्त; केंद्रीय पथकाची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 10:52 IST

औरंगाबादच्या निकृष्ट व्हेंटिलेंटर्सचा भंडाफोड

औरंगाबाद : केंद्र सरकारने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला (घाटी) पुरविलेल्या १५० निकृष्ट व्हेंटिलेटर्सची पाहणी करण्यासाठी गुरुवारी दिल्लीतील दोन रुग्णालयांतील वरिष्ठ डाॅक्टर घाटीत दाखल झाले. तब्बल ५ तासांवर केलेल्या पाहणीत व्हेंटिलेटर्स नादुरुस्तच असल्याचे समोर आल्याची माहिती घाटीतील सूत्रांनी दिली. दरम्यान, आगामी दोन ते तीन दिवस घाटीसह ज्या रुग्णालयांत हे व्हेंटिलेटर्स देण्यात आले आहेत, त्यांचीही पाहणी करून अहवाल दिला जाणार आहे.केंद्र सरकारकडून घाटीला प्राप्त झालेल्या व्हेंटिलेटर्सची नादुरुस्तीची अवस्था  सर्वप्रथम ‘लोकमत’ने समोर आणत विविध वृत्तांमधून त्यासंदर्भात पाठपुरावा केला. घाटी रुग्णालयात गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास दिल्लीतील सफदरजंग हाॅस्पिटलच्या भूलशास्त्र विभागाचे असोसिएट प्रोफेसर डाॅ. अरीन चौधरी आणि आरएमएल हाॅस्पिटलच्या भूलशास्त्र विभागाचे असोसिएट प्रोफेसर डाॅ. रूपेश यादव हे दाखल झाले. प्रारंभी, अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुुरेश हरबडे, वैद्यकीय उपअधीक्षक डाॅ. विकास राठोड, डाॅ. संजय वाकुडकर यांच्याशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर मेडिसिन विभागातील एका रिकाम्या वाॅर्डात रांगेत ठेवलेल्या व्हेंटिलेटर्सची त्यांनी पाहणी केली.  काही व्हेंटिलेटर्स शहरातील खासगी रुग्णालयांना आणि अन्य जिल्ह्यांना दिले आहेत. हे वरिष्ठ डाॅक्टर तेथेही भेट देऊन पाहणी करतील. त्याचा सविस्तर अहवाल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला तसेच न्यायालयात सादर करण्यात येईल. ऑडिट झाले?व्हेंटिलेटरचे ऑडिट करण्यासाठी यापूर्वी एक पथक येऊन गेले, त्यांच्याकडूनही सविस्तर पाहणी करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली; परंतु प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने व्हेंटिलेटर्ससंदर्भात काहीही न बोलण्याची भूमिका घाटी प्रशासनाने घेतली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या