शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: औरंगाबादमध्ये कोरोना बळींच्या अंत्यसंस्काराला माणसे मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 06:54 IST

मृतदेहांच्या पॅकिंगमध्ये अडचणी; आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने डाॅक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यातही मृत्यूचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. परिणामी, या मृतदेहांचे पॅकिंग करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. परिणामी, ७ ते ८ तास मृतदेह वाॅर्डांतच पडून राहात आहेत. ही परिस्थिती दूर करण्यासाठी माणसांची शोधाशोध करण्याची वेळ घाटी रुग्णालय प्रशासनावर ओढवली आहे.औरंगाबादेत गेल्या ३ आठवड्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या सगळ्यात अत्यवस्थ अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरातही वाढ झाली.  सरासरी प्रतिदिन २५ ते ३० रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. हे काम घाटीत कंत्राटी तत्त्वावरील संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. मृत्यूचे प्रमाण वाढल्याने मृतदेहाच्या पॅकिंग कामावर परिणाम झाला आहे. मृतदेह पॅकिंग करण्यासाठी ७ ते ८ तासांचा विलंब होत आहे. परिणामी, मृतदेह वाॅर्डातच पडून राहत आहेत. कंत्राटी तत्त्वावर मृतदेहाचे पॅकिंग करण्यासाठी दोन संस्था नियुक्त करण्याची मागणी करण्यात आल्याचे घाटीतील वरिष्ठ डाॅक्टरांनी सांगितले. दोन एनजीओच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात मृतदेहांचे पॅकिंग केले जात आहे. त्यात कोणतीही अडचण नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी म्हणाले.नाशकात नियम डावलून कला केंद्रात छमछम नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील गुरेवाडी शिवारात कोरोना नियमांची पायमल्ली करून व परवाना नसताना पायल कला केंद्रात नृत्यांगणांची छमछम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड टाकत मालकासह पाच संशयितांना अटक केली.  संशयितांची जामिनावर सुटका करण्यात आली. बंद खोलीत लाऊडस्पीकरच्या आवाजावर अश्लील नृत्य केले जात होते.  पोलिसांनी छापा टाकल्यानंतर अंधाराचा फायदा घेत अनेकजण पसार झाले. विशाल धोंडीराम मुसळे (रा. पडासाळी, जि. सोलापूर) हा कला केंद्राचा मालक पोलिसांना सापडला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या