शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

coronavirus lockdown : किर्गिस्तानात अडकलेल्या महाराष्ट्रातील मुलांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:48 IST

 परदेशात अडकलेले विद्यार्थी घरी येतील, यासाठी ठोस प्रयत्न लोकप्रतिनिधी करीत नसल्याची टीका पालकांकडून होत आहे. 

ठळक मुद्देविमान लँडिंगची परवानगी नाही अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांची व्यवस्था

औरंगाबाद : किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथील इंटरनॅशनल स्कूल आॅफ मेडिसिन (आयएसएम)मध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे औरंगाबादसह राज्यभरातील अनेक विद्यार्थी कोरोनामुळे अडकून पडले आहेत. देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थी परतत आहेत; परंतु विमानसेवेअभावी महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. 

महाराष्ट्र राज्यात विमान उतरण्यासाठी परवानगी मिळत नसल्याचे दिल्लीतील अधिकारी पालकांना सांगत आहेत. त्यामुळे मुलांच्या चिंतेने पालक लोकप्रतिनिधींकडे मदत मागत आहेत. परंतु आश्वासन आणि दिल्लीकडे बोट दाखविण्यापलीकडे काहीही होत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. मुलांच्या काळजीने पालक वारंवार विदेश मंत्रालयास संपर्क साधत आहेत. परंतु त्यांच्याकडून महाराष्ट्राकडे बोट दाखविले जात आहे. महाराष्ट्रामध्ये विमान उतरण्यास परवानगी दिली जात नसल्याचेच विदेश मंत्रालयाकडून पालकांना सांगितले जात आहे. कोरोनाच्या काळात अनेक प्रकारची मदत केली जात असल्याचे दावे सरकारकडून केले जात आहेत; परंतु परदेशात अडकलेले विद्यार्थी घरी येतील, यासाठी ठोस प्रयत्न लोकप्रतिनिधी करीत नसल्याची टीका पालकांकडून होत आहे. 

बिश्केक येथील आयएसएममध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी गेल्या दोन महिन्यांपासून वसतिगृह आणि फ्लॅटमध्ये अडकून पडलेले आहेत. ‘एमबीबीएस’च्या पहिल्या वर्षातील विद्यार्थी वसतिगृहात आणि पुढील वर्षातील विद्यार्थी फ्लॅटमध्ये राहतात. येथील लॉकडाऊनमुळे या विद्यार्थ्यांना आहे त्याच ठिकाणी थांबण्याची सूचना करण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना जेवणासह अनेक असुविधांना सामोरे जावे लागत आहे.हताश झालेले विद्यार्थी पालकांशी संपर्क साधत आहेत. घरी येण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करीत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास २५ विद्यार्थी तेथे असल्याचे सांगितले जात आहे. राज्यभरातील दीड हजारांहून अधिक विद्यार्थी अडकल्याची भीती आहे. त्यांचे पालक लोकप्रतिनिधींसह शासनाचे लक्ष वेधत आहेत. राज्य सरकारसह भारत सरकारकडे त्वरित प्रयत्न करण्याची मागणी हे पालक सतत करीत आहेत. 

महाराष्ट्रासाठी एकही विमान नाहीकिर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथून १३ जूनपर्यंत भारतासाठी विमान सोडण्यात येणार आहे; परंतु यात महाराष्ट्रासाठी एकही विमान नाही. अन्य राज्यांच्या विमानात महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना घेण्यात येणार नाही. शहरातील आणि राज्यातील लोकप्रतिनिधींशी संपर्क केला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करावा. - डॉ. अनिल पाटील चिकटगावकर, विद्यार्थ्याचे पालक 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी