शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

CoronaVirus : लॉकडाऊन वाढल्याने परप्रांतीयांमध्ये अस्वस्थता; तहसील प्रशासनाकडून शिबिरांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 19:45 IST

शिबीरातील मजुरांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.

ठळक मुद्देपैठण तालुक्यात विविध राज्यातून १६३० मजूर कामासाठी आलेले आहेत.

पैठण : आपल्या राज्यात परत जाण्यासाठी लॉकडाऊन संपण्याची वाट पाहणाऱ्या परप्रांतीय मजुरांत लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने अस्वस्थता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाच्या वतीने आज पैठण तालुक्यातील परप्रातीय मजुरांच्या विविध शिबीराची पाहणी करण्यात आली.  

शिबीरातील मजुरांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान, लॉकडाऊन संपल्यानंतर प्रशासन मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्याची व्यवस्था करेल मजुरांनी कुठलाही आततायीपणा करू नये असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.

पैठण तालुक्यात विविध राज्यातून १६३०  मजूर कामासाठी आलेले आहेत. या पैकी मध्यप्रदेश राज्यातून  १५१३ मजूर पैठण तालुक्यात वीटभट्टी कामासाठी आलेले आहेत. एकूण कामगाराच्या ९३% मजुर हे मध्यप्रदेशातील आहे.  या शिवाय उत्तर प्रदेश, बीहार, राजस्थान, कर्नाटक व झारखंड येथील कामगार आहेत. या सर्वांची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने १५ शिबीरात करण्यात आली आहे. या शिबिराचे स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तीना पालकत्व देण्यात आले आहे.

पैठण येथील शिबीरात ५६२, मुधलवाडी ५४, औद्योगिक वसाहत पैठण २३, पाचोड २४०, पाटेगाव १३०, बीडकीन ६३२, थेरगाव १६ व बोकूड जळगाव येथील शिबीरात ३७  परप्रांतीय मजुरांची सोय करण्यात आली आहे.

दरम्यान या शिबीरातील मजुरांची लॉकडाऊन कालावधी वाढल्याने अस्वस्थता वाढल्याचे समोर आल्याने जिल्हाधिकारी उदय चौधरी  औरंगाबाद यांनी शिबीरात जाऊन या मजुरांना दिलासा द्यावा अशा सूचना दिल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले. दरम्यान आज तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी पैठण तालुक्यातील विविध शिबीरात जाऊन मजुरांशी हंवाद साधला, मजुरांच्या व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांना दिलासा दिला.

परप्रांतीय मजुराच्या शिबीराचे पालकत्वकाकासाहेब बरवे, सचिन भालसिंग, संदिप आहेर, राजुभाई वीटभट्टीवाले,  पवन शिसोदे, मालू वीर, जुबेर टेकडी, सयद टेकडी, राम पंजावाले, गणेश पंजावाले, विठठल कृपा जिंनिग आणि प्रेसिंग, पेरे गुरुजी, एल आणि टी कंपनी ( श्री पत्रा ), सरोवती इलेक्ट्रीकल थापटी व  सयद हसन यांनी स्विकारले आहे. प्रशासन या शिबीरातील व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहे.पैठण तालुक्यातील परप्रातीय मजुरात कुठलीही अस्वस्थता नसल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद