औरंगाबाद : समतानगरमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे नातेवाईक आणि संपर्कातील १३ लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
शहरात एककीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त होताना नवीन रुग्ण समोर येत आहे. शहरात रविवारी आणखी एका कोरोनाबाधीताची भर पडली आहे. समतानगर येथील राहणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. औरंगाबादेतील बाधीतांचा आकडा ३२ वर पोहचला आहे. या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात आला. नातेवाईकांसह १३ जणांची तपासणी करण्यात आली होती.