शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : निडर योद्ध्याप्रमाणे डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा कोरोनाविरुद्ध लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 19:06 IST

कोरोना संशयित रुग्णांपासून, तर पॉझिटिव्ह रुग्णावर डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी कोणतीही भीती न बाळगता निष्ठेने  उपचार करीत आहेत.

ठळक मुद्दे डॉक्टर आणि प्रत्येक आरोग्य कर्मचारी २४ तास अलर्ट पॉझिटिव्ह रुग्णानंतरही डॉक्टर, कर्मचारी सकारात्मक

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : कोरोना व्हायरसच्या भयामुळे साध्या शिंकणाऱ्या व्यक्तीपासून अनेकजण दूर पळत आहे. मात्र, त्याच वेळी कोरोना संशयित रुग्णांपासून, तर पॉझिटिव्ह रुग्णावर डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी कोणतीही भीती न बाळगता निष्ठेने  उपचार करीत आहेत. निडर योद्ध्याप्रमाणे २४ तास अलर्ट राहून हे सर्वजण काम करीत आहेत.

कोरोना अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने मराठवाड्यातील आरोग्य यंत्रणा ‘हाय अलर्ट’ झाली आणि पाहता पाहता संशयितापाठोपाठ पॉझिटिव्ह रुग्णही समोर आला. घाटीत ११ मार्च रोजी पहिला संशयित दाखल झाला. तेव्हापासून डॉक्टर आणि प्रत्येक आरोग्य कर्मचारी २४ तास अलर्ट राहत आहे. पहिला रुग्ण निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तेव्हापासून घाटीत संशयित रुग्ण दाखल झालेला नाही; परंतु येथील कोरोना व्हायरस मदत केंद्र सध्या महत्त्वाची भूमिका निभावत आहे. कोणी पुण्यावरून, कोणी मुंबई, तर कोणी नागपूरवरून आल्याचे सांगत कोरोनाचा संशय व्यक्त करतात. अशांची तपासणी करून निदान करण्याचे काम डॉक्टर करीत आहेत कोणत्याही भीतीशिवाय.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, डॉ. मोहन डोईबळे, डॉ. कैलास झिने, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. अविनाश लांब, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ. ज्योती बजाज, डॉ. सुचेता जोशी, डॉ. विकास राठोड यांच्यासह ‘सीव्हीटीएस’ विभागाच्या इमारतीत साकारण्यात आलेल्या विशेष विभागातील स्टाफ नर्स, परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी दक्ष राहून कर्तव्य बजावत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. सुनील गायकवाड, डॉ. पद्मजा सराफ, डॉ. पद्मा बकाल, डॉ. प्रदीप कुलकर्णी, डॉ. महेश लड्डा, डॉ.संतोष नाईकवाडे आणि रुग्णालयाचे पथक संशयित रुग्णांवर उपचाराची महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते हे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. परदेशातून ग्रामीण भागात परतणाऱ्यांची तपासणी करण्यावर भर आहे. मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह मनपाचे आरोग्य कर्मचारीही सध्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या भागात सर्वेक्षणासह अनेक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णानंतरही डॉक्टर, कर्मचारी सकारात्मकरु ग्णालयात पॉझिटिव्ह रुग्ण आहे, हे माहीत असून डॉक्टर, कर्मचाऱ्यांत कोणतीही भीती नाही. खबरदारीसह सकारात्मक राहून प्रत्येक जण नियमित कामकाज करीत आहे, त्यांच्यात कोणत्याही प्रकारे भीतीचे वातावरण नाही, असे खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.

शांतचित्ताने कामकाजकोरोना हे एक नवीन आव्हान आहे. ते आव्हान  यशस्वीपणे पार केले जाईल, असे वाटते. जनतेसह आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हा ताणतणावाचा कालावधी आहे; परंतु प्रत्येक आरोग्य कर्मचारी शांतचित्ताने काम करून चांगली सेवा देत आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत दक्ष राहावे लागत आहे. - डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

एकत्रित जबाबदारीकोरोनासंदर्भात सकाळपासून सायंकाळपर्यंत येणाऱ्या फोनचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येकाचे समाधान करावे लागते. कर्मचाऱ्यांना रुग्णसेवेसाठी प्रोत्साहन द्यावे लागते. या परिस्थितीत प्रत्येक कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. मनपा हद्दीत रुग्ण असूनही आम्हीही मदत करीत आहोत. कारण ही सर्वांची जबाबदारी आहे.- डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

खबरदारीवर भरसध्या रुग्णालयात रुग्ण नाही; परंतु तरीही आम्ही खबरदारी म्हणून तयारी करीत आहोत. आवश्यक बाबींची पूर्तता करून घेत आहोत. २४ तास अलर्ट राहावे लागत आहे. प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत. दिवसभरात आढावा बैठकांना जावे लागते. रुग्णालयातील स्थिती जाणून घ्यावी लागते.    - डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

कर्तव्याची ठरावीक वेळ नसते कर्तव्याची कोणतीही ठरावीक वेळ नसते. २४ तास दक्ष राहावे लागत आहे. रुग्णालयात काही सुविधा नसेल, तर त्या तात्काळ उपलब्ध करून घेण्याकडे लक्ष द्यावे लागत आहे. रुग्णालयात विनाकारण गर्दी होणार नाही,याकडे लक्ष देत आहे. दिवसभरातील बहुतांश वेळ रुग्णसेवेसाठी जात आहे. - डॉ. सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबाद