शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

coronavirus : कोरोनाचा कहर त्यात पावसाला बहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 17:16 IST

सतत पडणारा रिमझिम पाऊस सुखावणारा वाटत असला तरी पावसाळी हवा आणि थंड वातावरण अनेक संसर्गजन्य आजारांना पोषक ठरणारी आहे.

ठळक मुद्देपावसाने अनेक रोगरार्इंना निमंत्रणसंसर्गजन्य आजार वाढले 

औरंगाबाद : आधीच कोरोनाचा कहर आणि त्यात पावसाला आलेला बहर यामुळे अनेक संसर्गजन्य आजारांना आपसूकच निमंत्रण मिळत आहे. कोरोना आणि पाऊस या दोन्ही गोष्टींमुळे आरोग्याबाबत अधिकाधिक  जागरूक होण्याची गरज आहे, असा सल्ला तज्ज्ञ मंडळी देत आहेत. 

शहरात मागील ४ दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. सतत पडणारा रिमझिम पाऊस सुखावणारा वाटत असला तरी पावसाळी हवा आणि थंड वातावरण अनेक संसर्गजन्य आजारांना पोषक ठरणारी आहे. लॉकडाऊननंतर नागरिकांचा मुक्तसंचार वाढलेला आहे. कोरोनाची भीती कमी होऊन एकमेकांना भेटणे, खरेदीसाठी बाहेर पडणे याचे प्रमाणही वाढलेले आहे. या मुक्तसंचाराला आळा घाला आणि बाहेर पडताना योग्य ती काळजी घ्या, असेही डॉक्टरांनी सुचविले.

हॉटेल बंद असल्याने खवय्यांना चटकदार खाद्यपदार्थांचा  आस्वाद घेता आला नाही. सध्या विविध खाद्यपदार्थांच्या ठेल्यांवर खवय्यांची गर्दी दिसत आहे; परंतु पावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा. यामुळे जुलाब, उलट्या होऊ शकतात. कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती या दिवसांमध्ये परवडणारी नाही. त्यामुळे घरी तयार केलेले सकस आणि ताजे अन्नच या दिवसांमध्ये खावे, असे डॉक्टरांनी आवर्जून सांगितले.

योगासने आणि प्राणायाम करावाचालणे, धावणे, सायकलिंग असे व्यायाम करणे सध्या पावसामुळे अशक्य होत आहे. त्यामुळे घरच्या घरी नियमित योगासने आणि प्राणायाम करावा. श्वासावर नियंत्रण ठेवणाऱ्या प्राणायामामुळेही अनेक आजारांचा संसर्ग रोखता येतो. 

रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ देऊ नकाकोरोनापासून बचाव करण्यासाठी आपण जी काळजी घेत आहोत, तीच काळजी पावसामुळे उद्भवणाऱ्या इतर संसर्गजन्य आजारांपासूनही आपल्याला सुरक्षित ठेवू शकते. मास्क वापरा, बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळा, थंडी-पावसात जाणे टाळा आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपासून ६ फूट अंतर राखा. आवळा, मोसंबी, पेरू ही व्हिटॅमिन सीचा भरपूर पुरवठा करणारी फळे खा. झिंकयुक्त पदार्थांचे सेवनही वाढवा. रोगप्रतिकारशक्ती कमी  होणार नाही, याची प्रत्येकानेच काळजी घ्यावी. - डॉ. संजय पाटणे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद