शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

coronavirus : कोरोना दक्षता; औरंगाबादमध्ये ९०८ नागरिकांना केले होम क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 16:26 IST

औरंगाबाद महापालिकेसह सर्व शासकीय यंत्रणांनी चांगलीच कंबर कसली आहे.

ठळक मुद्देशहरात २,३२८ बेडची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये १२३ बेडची तयारी करण्यात आली.

औरंगाबाद : कोरोना व्हायरस एका दिवसातही मोठ्या प्रमाणात पसरू शकतो. एकाच दिवशी अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास धावपळ होऊ नये म्हणून औरंगाबाद महापालिकेसह सर्व शासकीय यंत्रणांनी चांगलीच कंबर कसली आहे. शहरात २,३२८ बेडची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये १२३ बेडची तयारी करण्यात आली. आतापर्यंत ९०८ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये १७ विदेशवारी केलेल्या नागरिकांचा समावेश आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात महापालिकेनेही जय्यत तयारी केली आहे. सध्या कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. एका खासगी महाविद्यालयातील कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाचा अहवाल देखील आता निगेटिव्ह आला. तसेच शहरातील सर्व संशयितांचे अहवाल देखील निगेटिव्ह आल्याने शहरात शनिवारपर्यंत एकही संशयित रुग्ण नव्हता. 

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ९०८ नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या ७२६ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामध्ये ४२६ विद्यार्थ्यांचा, तर इतर ३०० जणांचा समावेश आहे. या सर्वांना १४ दिवस घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच जिल्हाभरात इतर १८२ नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आहे.

ते १७ जण होम क्वारंटाईन कामानिमित्त विदेशात गेलेल्या १७ नागरिकांना शहरात दाखल झाल्यानंतर त्वरित होम क्वारंटाईन करण्यात आले असून, त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात आला आहे. पुढील १४ दिवस त्यांना घराबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली असून, त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

आणखी तीन ठिकाणी तपासणी केंद्रे

महापालिकेने आणखी तीन ठिकाणी तपासणी केंद्रे सुरू केली आहेत. यामध्ये केम्ब्रिज चौक, हर्सूल टी-पॉइंट, पैठण-बीड बायपास रोडचा समावेश आहे. आयसोलेशनची तयारी... चिकलठाणा, कबीरनगर, समाजकल्याण पदमपुरा, घाटी, सिव्हिल हॉस्पिटल, अशा एकूण पाच ठिकाणी २४२ बेडची व्यवस्था केली आहे.क्वारंटाईनसाठी जागा निश्चित :  कलाग्राम, देवगिरी महाविद्यालय, एमसीईडी, समाजकल्याण कार्यालय, अशा चार ठिकाणी २,३४८ बेडची व्यवस्था केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस