शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात झाली साफसफाई; लवकरच होणार औषधी पुरवठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 18:21 IST

राज्यमंत्री, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी दिली अचानक भेट...

- श्यामकुमार पुरे

सिल्लोड : सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात औषधींचा तुटवडा, घाणीचे साम्राज्य याबाबत लोकमत ने वृत्त प्रकाशीत केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.शुक्रवारी सकाळी  आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयाची  साफ  सफाई केली. उपजिल्हा रुग्णालयात सर्वत्र मेडिकल असोसिएशन व रुग्ण कल्याण समिती, नगर परिषद  मार्फत  जंतू नाशकाची फवारणी करण्यात आली. आरोग्य विभागाने दक्ष राहण्याच्या सूचना देऊन तुटवडा असलेली औषध पुरवठा लवकरच केला जाईल याबाबत आरोग्य विभागाने मागणी करावी अशा सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी  अचानक उपजिल्हा रुग्णालयाला शुक्रवारी दुपारी  भेट दिली. त्यांनी रुग्णालयातील उपाय योजनेचा आढावा घेऊन खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घाणीचे साम्राज्य बघून काम चुकार कर्मचाऱ्यांना खडसावले. सर्वत्र साफ सफाई करण्याचे आदेश दिले. कोरोना व्हायरसचा पार्श्वभूमीवर शुक्रवार ( दि. 20 ) रोजी ना. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील प्रशासकीय उपाययोजनांचा आढावा घेतला . तसेच उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे, अब्दुल समीर अब्दुल सत्तार, नगराध्यक्षा राजश्री निकम, वैद्यकीय अधीक्षक हर्षल सरदेसाई, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे आदींची उपस्थिती होती.

प्रशासन सज्ज, 100 बेडची व्यवस्था.....खबरदारीचा उपाय म्हणून सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात 20 बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला असून शहरातील 20 खाजगी रुग्णालयांमध्ये प्रत्येकी पाच बेड याप्रमाणे शंभर बेडची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहेत. त्याचबरोबर सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात पन्नास बेडचे आयसोलेशन वॉर्ड व ग्रामीण रुग्णालयात 15 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.  त्यामुळे नागरिकांनी भयभीत न होता आरोग्य विभाग व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास आपण कोरोना पासून सुरक्षित राहू असे ना. अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस