शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus औरंगाबादला समूह संसर्गाचा धोका कायम; तिसरा टप्पा सुरू ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 13:56 IST

शहरात जुन्या भागांसह नव्या भागांत कोरोनाचे रुग्ण आढळणे सुरूच

ठळक मुद्देएका भागापुरता कोरोना मर्यादित राहिला नाही.शहर दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात गेल्याची भीती

औरंगाबाद : शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. जुन्या भागांसह नव्या भागांत कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. शहर दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात गेल्याची भीती व्यक्त होत आहे. या टप्प्यात समूह संसर्ग होतो आणि शहरात त्याची सुरुवात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शहरात १५ मार्च रोजी पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे निदान झाले होते, तेव्हा आरोग्य यंत्रणा हादरून गेली होती. हा रुग्ण परदेशातून शहरात परतलेला होता. आरोग्य विभाग, मनपा प्रशासनाने त्याच्या संपर्कातील ६०० वर लोकांची तपासणी केली; परंतु कोणीही कोरोनाबाधित आढळून आले नाही. पहिला पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होऊन घरीही परतला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, एप्रिलच्या प्रारंभी दोन नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यानंतर ५ एप्रिल रोजी एकाच दिवशी ७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या रुग्णांसह त्यानंतरच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांना बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचले. त्यानंतर आता एकाच वेळी अनेक रुग्ण आढळत आहेत. शिवाय एका भागापुरता कोरोना मर्यादित राहिला नाही. त्यामुळे तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झाल्याची भीती आहे.

कोरोनाचे टप्पे1. परदेशातून कोरोनाबाधित व्यक्ती देशात येणे, हा कोरोनाचा पहिला टप्पा होता. विमानतळावर परदेशी प्रवाशांची तपासणी झाली. या तपासणीनंतरही परदेशातून परतलेले नागरिक बाधित असल्याचे शहरात आढळून आले.2. दुसऱ्या टप्प्यात बाधित व्यक्तीकडून स्थानिक संपर्कातील व्यक्तीला बाधा होते. शहरातील नागरिक या टप्प्याला सामोरे गेले आहेत. 3. तिसऱ्या टप्प्यात स्थानिक बाधित व्यक्तीकडून समूहात विषाणूचा फैलाव होतो. सध्या या टप्प्यात शहर गेल्याची भीती व्यक्त होत आहे.4. चौथ्या टप्प्यात बाधित समूहाकडून पूर्ण प्रदेशात उद्रेक होतो. हा टप्पा सर्वात गंभीर मानला जातो. 

तिसऱ्या टप्प्यात गेल्यासारखेशहर तिसऱ्या टप्प्यात गेल्यासारखे वाटत आहे. कारण आधी एकाच भागात रुग्ण आढळून येत होते. आता कोणत्याही भागातून रुग्ण येत आहेत. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येणे थांबले होते, तेथेही पुन्हा रुग्ण आढळत आहेत.- सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद