शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Aurangabad : ग्रामीण भागात रेड अलर्ट; आठवडाभरात कोरोना शिरला ५९ नव्या गावांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 12:27 IST

CoronaVirus in Aurangabad : कोरोनाचे संक्रमण गेल्या १५ दिवसांपासून शहरापेक्षा ग्रामीण भागात वाढत आहे.

ठळक मुद्देकोरोनामुक्तीच्या वाटेवरील ११ गावांत पुन्हा संक्रमण सक्रिय रुग्णसंख्या असलेल्या गावांची संख्या वाढून झाली ६९५

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढतच आहे. गेल्या आठवडाभरात ५९ नव्या गावांत कोरोना विषाणूचे संक्रमण शिरले आहे. २५ एप्रिलला सक्रिय रुग्ण ६३३ गावांत होते. त्यात २ मेपर्यंत ६२ गावांची भर पडून आता ६९५ गावांतील सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर २८ दिवसांपासून रुग्ण न आढळलेल्या म्हणजेच कोरोनामुक्तीच्या वाटेवरील गावांची संख्या १३३ वरून ११ ने घटून १२२ झाली.

कोरोनाचे संक्रमण गेल्या १५ दिवसांपासून शहरापेक्षा ग्रामीण भागात वाढत आहे. त्यात कोरोनाची चाचणी गेल्या आठवड्याच्या शेवटी घटलेली पहायला मिळाल्याने बाधितांचा आकडा पाचशेच्या आत दिसून आला. मात्र, नव्या गावांत आणि कोरोनामुक्तीच्या वाटेवरील गावांत कोरोनाचा पुन्हा शिरकाव हे चिंताजनक असून आरोग्य विभागासह जिल्हा परिषदेनेही त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सध्या ग्रामीण भागातील मृत्यूचा दर वाढलेला आहे. तसेच गंभीर रुग्ण शेवटच्या क्षणी उपचारासाठी दाखल होत असल्याचेही निरीक्षण घाटीच्या तज्ज्ञांनी नोंदवल्याने कोरोना रुग्णांचा शोध व ट्रेसिंग वाढवण्यावर भर तसेच ग्राम दक्षता समित्यांकडून तपासणीला आणखी सहकार्य अपेक्षित आहे.

४२ गावांत १०० पेक्षा अधिक रुग्णजिल्ह्यात १३६८ गावांपैकी ११५३ गावांत कोरोनाचा शिरकाव आतापर्यंत झाला, तर २ मे रोजी ६९५ गावांत सक्रिय रुग्ण आहेत. ४७६ गावांत २५ पेक्षा कमी, १२१ गावांत २५ ते ५० दरम्यान रुग्ण आहेत, तर ५० ते १०० दरम्यान ५६ तर १०० पेक्षा अधिक ४२ गावांत रुग्ण आहेत.

२ मेची स्थितीतालुका -बाधित गावांची संख्याऔरंगाबाद -९६फुलंब्री -४५गंगापूर -१०२कन्नड -१०२खुलताबाद -२३पैठण -११०सिल्लोड -७७सोयगाव -१०४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद