शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

Coronavirus In Aurangabad : लॉकडाऊनच्या काळात कोणाचीही गय केली जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 19:57 IST

लॉकडाऊन केवळ ९ दिवस आहे. मात्र, या कालावधीत संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल.

ठळक मुद्दे१० तारखेपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होईल. शहराच्या ६ सीमेवर पोलीस अधिकाऱ्याचे चेकपोस्ट

औरंगाबाद : शहरातील वाढत्या कोरोना साथीची साखळी तोडण्यासाठी १० ते १८ जुलैदरम्यान राबविण्यात येणारे लॉकडाऊन अत्यंत कडक असेल. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलीस चांगलाच धडा शिकविण्याच्या तयारीत आहेत. यादृष्टीने पोलीस प्रशासनाचे संचारबंदीची रूपरेषा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

पोलीस उपायुक्त मीना मकवाना म्हणाल्या की, लॉकडाऊन केवळ ९ दिवस आहे. मात्र, या कालावधीत संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. १० तारखेपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होईल. यासाठी  पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. शहरात ३ हजार ५०० पोलीस आहेत. शहर पोलिसांच्या मदतीला सध्या राज्य राखीव दलाची एक कंपनी आहे. आणखी एका कंपनीची मागणी केली आहे. याशिवाय ३५० होमगार्ड जवान कार्यरत आहेत. ४५ पेक्षा कमी वयाच्या आणखी १०० होमगार्डची मागणी करण्यात आली.  शहराच्या ६ सीमेवर पोलीस अधिकाऱ्याचे चेकपोस्ट असेल.  शहरातील विविध चौक आणि संवेदनशील भाग, असे मिळून ३८ ठिकाणी फिक्स तपासणी पॉइंट असतील. तेथे नियमित नाकाबंदी केली जाईल. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. 

५०० पोलीस तैनातकोरोनाबाधित क्षेत्रात सील केलेल्या ठिकाणी पोलीस मुख्यालयाचे सुमारे ५०० पोलीस कर्मचारी तैनात आहेत. शिवाय प्रत्येक पोलीस ठाण्याला दोन ते तीन, असे सुमारे १०० पोलीस नाकाबंदीसाठी संलग्न आहेत.

एसीपीची नियमित रात्रगस्त शहरातील कोरोनाबाधित क्षेत्रात आणि फिक्स पॉइंट, तसेच शहराच्या सीमा असलेल्या ठिकाणी पोलीस हजर राहतात अथवा नाही हे पाहण्यासाठी वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. दिनेश कोल्हे हे रोज रात्री १० ते २ वाजेपर्यंत गस्तीवर असतात. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद