शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

coronavirus : औरंगाबादमध्ये ५१ ते ८० वयोगटात सर्वाधिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 19:26 IST

कोरोनाबाधितांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण चिंताजनक

ठळक मुद्देऔरंगाबादमध्ये ज्येष्ठांचे सर्वाधिक बळी 

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये ५१ ते ८० या वयोगटातील रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. या वयोगटातील तब्बल ८८ लोकांचा या महामारीने बळी घेतला. कोरोनाबाधितांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. 

औरंगाबाद शहरात कोरोनामुळे ५ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला होता. एप्रिलअखेरपर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ ७ होती; परंतु मे महिना उजाडला आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांचे निदान होत आहे. या सगळ्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. जून महिना उजाडला आणि मयत रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली. कोरोनामुळे होणारे मृत्यू  रोखण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

५१ वर्षांवरील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असून, बहुतांश मयत रुग्णांना कोरोनासह अन्य आजारही असल्याचे समोर आले आहे. यात मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब या आजारांचे प्रमाण अधिक आहे. एकाच वेळी अनेक आजारांमुळे  उपचारास प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मृत्यूचा धोका वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

चाळिशीखालील मृत्यू कमीकोरोनामुळे शहरात मृत्यू पावलेल्या रुग्णांत ४० वर्षांखालील रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी आहे, तर ५१ वर्षांवरील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मृत्यूचा सर्वाधिक धोका असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्येष्ठांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून होत आहे.

केवळ नावाला तपासणी : शहरात घरोघरी जाऊन ज्येष्ठांच्या शरीराचे तापमान आणि आॅक्सिजनचे प्रमाण तपासले जात आहे. तपासणीदरम्यान त्यांचे आरोग्य बरे नसले तरी संबंधितांना कोणतीही सूचना केली जात नाही. ज्येष्ठांच्या अन्य आजारांचीही कोणतीही नोंद घेतली जात नाही. त्यामुळे ज्येष्ठांना कोरोनाचा धोका टाळण्यासाठी फारशा उपाययोजना होताना दिसत नाहीत.

सर्वेक्षण सुरू, डेथ आॅडिट करणारशहरात नागरिकांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी अ‍ॅपची मदत घेतली जात आहे. त्यातून कोणाला त्रास असेल तर लवकरात लवकर उपचार करता येऊ शकेल. मयत रुग्णांत मधुमेह, उच्च रक्तदाब रुग्णांची संख्या अधिक आहे. समितीच्या माध्यमातून डेथ आॅडिटही केले जाणार आहे. - डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

वयोमानानुसार मृत्यूवयोमान     मृत्यू२१ ते ३०         १३१ ते ४०        ८४१ ते ५०        १६५१ ते ६०        ३३६१  ते ७०        ३४७१ ते ८०        २१ ८० वरील       ८ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू